मोहम्मद पटेल यांच्या प्रमाणीकरण पाच हजार चे सोने दिले परत
गेवराई प्रतिनिधी
माणसात प्रमाणीकपणा व इमानदारी अजुन शिल्लक असल्याची घटना शहरात मंगळवार रोजी घडली असुन कटचिंचोली येथील एक जणाचे सोन्याचे एक ग्रामचे मणी हरवले होते.ते एकाला सापडले व सोन्याच्या दुकानाच्या पाकिटावरून ते सोन्याच्या दुकानदाराला परत करत ते जाचे होते त्याला परत करण्यात आले.यावेळी परत देणा-याचा सत्कार करण्यात आला.यावेळी अनेक जण उपस्थित होते.
रामभाऊ येवले राहणार कटचिंचोली यांनी शहरातील एका सोन्याच्या दुकानातुन पाच हजार रूपयाचे मणी विकत घेतले व ते मणी घेवुन गावांकडे जात असताना शहरातील शास्त्री चौकात ते मणी रस्त्यावर पडले मात्र हे येवले यांना लक्षात आले नाही.मात्र ते रस्त्यावरून जाणारे मोहमंद पटेल यांना सापडले. पटेल यांनी सोन्याच्या दुकानाच्या पिशवी वरून ते मणी सोन्याच्या दुकनदाराला परत नेवुन दिले. नंतर दुकानदार व मोहमंद पटेल यांनी रामभाऊ येवले यांना बोलावुन ते मणी परत केले.त्यामुळे मोहम्मद पटेल यांचा येवले व इतरांनी सत्कार केला. यावेळी सराफा व्यापारी संघटनेचे राजेश टाक,मनोज मैड,रामभाऊ येवले,पत्रकार सखाराम शिंदे,पप्पु मोहरकर, पप्पू नांदेवालीकर, अभिजीत ठाकुर,रघुवीर बेदरे गणेश चव्हाण सह इतर जण उपस्थित होते.