रोजगार हमी योजनेच्या गेवराई सदस्यपदी दत्ताभाऊ पिसाळ यांची निवड...
गेवराई(प्रतिनिधी)
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे साहेब यांच्या आदेशाने व श्री .अमरसिंहजी पंडित साहेब व विजयसिंहजी पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्ताभाऊ पिसाळ यांची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना गेवराई च्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे यावेळी त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होतं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व अमरसिंहजी पंडित साहेब व विजयसिंहजी पंडित साहेब यांचे निकटवर्तीय शिवछत्र परिवाराचे निस्सीम भक्त असणारे दत्ताभाऊ पिसाळ यांना याअगोदर ही वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी शिवछत्र परिवाराने दिली आहे.
याअगोदर र.भ. अट्टल महाविद्यालयाच्या स्थानिक नियामक मंडळावर सदस्यपदी तसेच राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव 2020 च्या अध्यक्षपदी व आता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या सदस्य पदी त्याची केलेली ही निवड त्यांच्या एकनिष्ठे ची पावतीच म्हणता येईल
या निवडी बद्दल त्यांनी अमरसिंहजी पंडित साहेब व विजयसिंहजी पंडित साहेब यांचे आभार मानले असुन त्यांच्या रूपाने तालुक्यातील धनगर समाजाच्या युवकाला या समितीवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतन्यता व्यक्त केली आहे.
