गेवराई येथील तरुण उद्दोजक सागर वाधवाणी यांचे निधन
गेवराई प्रतिनीधी
गेवराई येथील तरुण उद्दोजक , आकाश एजन्सीजचे मालक सागर सुरेशसेठ वाधवाणी यांचे मंगळवार , दि . १८ मे रोजी रात्री ८ वाजता दुःखद निधन झाले . मृत्यूसमयी त्यांचे वय ३९ वर्षे होते . त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा , एक मुलगी , आई - वडिल , बहीण - भाऊ बासा मोठा परिवार आहे . सागर वाधवाणी यांची अचानक तब्बेत खराब झाल्याने त्यांना औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . परंतु दिवसेंदिवस त्यांची तब्बेत बिघडतच गेली.हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पत्नी डॉ.रोमा वाधवाणी यांनी सुरुवातीपासून शेवटच्या श्वासांपर्यंत आपल्या पतीची मनोभावे सेवा केली.तब्बल २२ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर दि .१८ मे रोजी मंगळवारी रात्री ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.औरंगाबाद येथील ' कैलास धाम ' या स्मशानभूमीत त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले . याप्रसंगी सिंधी पंचायत गेवराईचे अध्यक्ष गुरुमुखसेठ बजाज , उपाध्यक्ष चंदनसेठ मंघारामाणी , सचिव जयराज कौराणी यांच्यासह जवळचे नातलग उपस्थित होते . गुरुवार दि .२० मे रोजी दुपारी ११ ते १२ यावेळेत गेवराई येथील सरस्वती कॉलनी नं .१ मधील ' सिंधी भवन ' मध्ये पगडी रसम [ उठावणा कार्यक्रम ] आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात कोरोनाच्या नियमानुसार शारीरिक अंतर ठेवून व मुखपट्टी लावून स्वत : च्या आरोग्याची काळजी घेण्याची विनंती सुरेशसेठ वाधवाणी , राजूसेठ वाधवाणी व सोनूसेठ वाधवाणी यांनी केली आहे . सागर वाधवाणी हे मनमिळावू स्वभावाचे होते.त्यांच्या निधनाने वाधवाणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .
