गेवराई रोजगार हमी योजनेच्या सदस्य पदी सोमेश्वर गचांडे
सिरसमार्ग प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील माजी सरपंच सोमेश्वर गचांडे यांची माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या आदेशानुसार गेवराई रोजगार हमी समीतीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे
गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील माजी सरपंच तथा खरेदी विक्री संघाचे संचालक सोमेश्वर गचांडे यांची माजी आमदार अमरसिंह पंडित ,माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडीत यांच्या शिपारीनुसार पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गेवराई रोजगार हमी योजनेच्या सदस्य पदी 19 मे रोजी निवड करण्यात आली आहे या निवडी मुळे सिरसमार्ग परिसरात आनंद साजरा करुण शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी माजी सभापती पांडुरंग कोळेकर, बाजार समितीचे संचालक संभाजी पवळ,सरपंच अशोक परदेशी, ग्रा.पं.सदस्य नारायण कोळेकर, सुरेश मार्कड,उध्दव पवळ,सुरेश पवळ,पत्रकार उत्तम हजारे, सुहास पवळ,रोहित लंबे, राम नवले, संपत पाबळे, शंकर लंबे,बाळासाहेब चिखले, द्वारकादास पाबळे, जालिंदर गचांडे, राजेंद्र गचांडे, सर्जेराव तांबारे,संतोष पाबळे, आसाराम पवळ,दादा पवळ,संतोष शेजाळ,बाळू रडे,कल्याण वाघमोडे इत्यादी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते
