महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

बीड जिल्ह्यात आणखी पाच दिवसाचे कडक लॉकडाऊन काल मध्यरात्री पासुन १२ मे पर्यंत अंमलबजावणी

बीड जिल्ह्यात आणखी पाच दिवसाचे कडक लॉकडाऊन 
काल मध्यरात्री पासुन १२ मे पर्यंत अंमलबजावणी 


बीड/प्रतिनिधी  

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी े जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी या पूर्वी लागु केलेले तीन दिवसाचे कडक लॉकडाऊन आता बुधवार १२ मे पर्यंत पाच दिवस  कायम केले असुन  दवाखाने, मेडिकल ,पेट्रालपंप, टपाल सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी  यांनी दिले असल्याने येणाऱ्या पुढील पाच दिवस देखील जिल्ह्यात कडक लोक डाऊन असणार आहे. दरम्यान आज शुक्रवारी रात्री बारा वाजल्या पासुन हे लॉकडाऊन सुरू होत आहे.  

बीड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आज शुक्रवार ७ मे २०२१ रोजी दुपारी  जिल्हाधिकारी जगताप यांनी लॉकडाऊनचे नवे आदेश काढले असुन आज शुक्रवार ७ मे २०२१ रोजी मध्यरात्री बारा वाजल्या पासुन लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरूवात होत असुन येत्या शनिवार ८ मे २०२१ ते बुधवार १२ मे २०२१ पर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे. पाच दिवसाच्या काळात बीड जिल्ह्यात केवळ दवाखाने, मेडीकल,पेट्रोलपंप, टपाल कार्यालय,लसीकरण केंद्रे,वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मास्युटिकल्स कंपन्या,सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या अस्थापना वगळता इतर कोणत्याही अस्थापना सुरू राहणार नाहीत.अत्यावश्यक सेवेत मोडणारे अस्थापना किराणा दुकाने, चिकन ,मटन विक्रीची दुकाने, बेकरी व कृषीशी संबधीत पूर्ण बंद राहणार आहे.

*आज मध्यरात्रीपासून नवीन आदेश:कोणत्यावेळी काय चालू व काय बंद राहणार*


१. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार व बुधवार (दिनांक ०८/०५/२०२१, ०९/०५/२०२१,१०/०५/२०२१,११/०५/२०२१ व १२/०५/२०२१) या दिवशी केवळ खालील आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील.
सर्व औषधालये (Medical), दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्रे, वैद्यकिय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा इ. उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत.
२. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार व बुधवार (दिनांक ०८/०५/२०२१, ०९/०५/२०२१ १०/०५/२०२१,
११/०५/२०२१ व १२/०५/२०२१) जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना किराणा
दुकाने, चिकन, मटन विक्रीचे दुकाने, बेकरी व कृषीशी संबंधित इ. पूर्णतः बंद राहतील.
३. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील.
४. तसेच प्रत्येक दिवशी (दिनांक ०८/०५/२०२१ ते १२/०५/२०२१) पर्यंत केवळ पायदळ | गाडीवर |
हातगाड्यावर फिरुन दुध, भाजी व फळांची विक्री केवळ सकाळी ७.०० ते १०.०० वाजेपर्यंत व फक्त
फळांची विक्री सायकांळी ०५.०० ते रात्री ०७.०० या वेळेत करता येईल.
५. बँकेचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते दु.१२.०० वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय
व्यवहारासाठी सुरु राहील. पेट्रोलपंप व गॅस एजंसी यांना कंपनीस देयके द्यावी लागतात तसेच पेट्रोलपंपावर
रोख रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होते. करिता पेट्रोल पंप व गॅस एजंसी यांना सदर वेळेत बँकेत जाऊन
कामकाज करता येईल.
६. सर्व अधिकारी/कर्मचारी जे कोरोना विषयक कामकाज करत आहेत (उदा. डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य
विभागाचे , महसूल विभागाचे, पोलीस विभागाचे, जिल्हा परिषदेचे इ.अधिकारी/ कर्मचारी) ज्यांचेकडे संबंधीत कार्यालय प्रमुखाने दिलेले ओळखपत्र असेल त्यांनाच कार्यालयात ये-जा करण्याची मुभा असेल.
७. दिनांक ०८/०५/२०२१ ते १२/०५/२०२१ या कालावधीत निर्बंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे
निदर्शनास आल्यास त्या सिल करण्यात येतील.
सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.सदर आदेशाचा अंमल दिनांक ०७/०५/२०२१ रोजीच्या रात्रीच्या १२.०० पासुन राहील असे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आदेश काढले आहेत.