बीड जिल्ह्यात संपन्न झाला आदर्श विवाह
गेवराई / प्रतिनिधी
गेवराई जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा टाकरवन येथील आदर्श मुख्याध्यापक व महाराष्ट्र शिक्षक संघाचे नेते आदरणीय श्री रत्नाकरजी वाघमारे सर यांनी आपल्या मुलीचा विवाहतून एक वेगळाच आदर्श जिल्ह्यात निर्माण केला आहे. श्री वाघमारे सर यांची कन्या चि.सौ.का.निकिता व चि. विलास यांचा विवाह सोहळा 20 मे 2021रोजी आयोजित केला होता.सदरील विवाह सोहळा श्री वाघमारे सर यांचे मुळगाव वारोळा तालुका माजलगाव या ठिकाणी साध्या पद्धतीने आयोजित केला होता. लॉकडाऊनचे नियम पाळून मोजकेच वर्हाडी या विवाह सोहळ्यास उपस्थित होते. प्रत्येकाला मास्क व सॅनिटायझर इत्यादी बाबींचे पालन या विवाह सोहळ्यात करण्यात आले होते.
या सोहळ्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अतिशय कमी खर्चात,अनावश्यक खर्चाला फाटा देऊन विवाह सोहळ्याच्या निमित्ताने बालग्राम गेवराई येथील अनाथाश्रमाला 11000 (आकरा हजार रुपये) सस्नेह भेट दिले. तसेच संघर्ष धान्य बँक गेवराई यांच्याकडे देखील अनाथ वंचिता साठी 2100 (दोन हजार शंभर रुपये) सस्नेह भेट देण्यात आले. आज-काल विवाहसोहळा म्हटले की अनेक अनावश्यक खर्च केले जातात व लाखो रुपये उडवले जातात परंतु श्री वाघमारे सर यांनी या सर्व अनावश्यक गोष्टीला फाटा देत जिल्ह्यातील बालग्राम व संघर्ष धान्य बँक या दोन सामाजिक संस्थेला मदत देऊन एक वेगळाच आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. बालग्राम या संस्थेमध्ये 106 अनाथ मुले राहत असून त्यांच्या किराणा व धान्य यासाठी 11 हजार रुपयांची मदत या विवाहप्रित्यर्थ करण्यात आली.तसेच संघर्ष धान्य बँक गेल्या तीन वर्षापासून अनाथ वंचितांना मदत करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा 2100रुपये मदत श्री वाघमारे सर यांच्याकडून देण्यात आली.या अतिशय साध्या पद्धतीने व आगळ्यावेगळ्या पद्धतीने झालेल्या विवाह सोहळ्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या सोहळ्याचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे असे आव्हान सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
