पशुधन खरेदीसाठी जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्थाने 30 शेतकऱ्यांना केले ५० लाखांचे अर्थ साहाय्य
------------------------------
गेवराई ( प्रतिनिधी )गेवराई तालुक्यातील गुंतेगाव, कटचिंचोली व लुखामसला या गोदावरी नदी पट्टयावरील व उजव्या कालवा जाणाऱ्या या तीन गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी हातभार लागावा या हेतूने या भागातील 30 शेतकऱ्यांना पशुधन खरेदीसाठी जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्थाने 50 लाख रूपयांचे अर्थ साहाय्य केले आहे. यातून शेतकऱ्यांनी पशुधन खरेदी केले असून, या पैशातून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केल्याने आर्थिक मदत होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, या केलेल्या मदतीमुळे जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष शिवनाथ मस्के यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देशात कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन आहे. या लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकां पासून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा कोरोना महामारीच्या परिस्थितीत गेवराई येथील जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्था ही सर्व सामान्य व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे असते या पतसंस्थेची स्थापना होऊन अवघे 5 वर्ष झाले आहे. या संस्थेने कमी दिवसात आपले नाव लौकिक केले असून, संस्थापक अध्यक्ष शिवनाथ मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली या पतसंस्थेचे कामकाज मोठ्या जोमाने सुरू असून, या संस्थेने देशात तसेच राज्यात उद्भवलेल्या कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी व माहामारीला हद्दपार करण्यासाठी जगदंबा महिला सहकारी पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवनाथ मस्के यांनी सामाजिक जाणिवेतुन संस्थेच्या वतीने मुख्यमंञी साहयता निधीसाठी ३१००० दिले. त्यांच प्रमाणे कोरोना या विषाणुजन्य परिस्थितीत ही पतसंस्थेने मदतीचा हात पुढे करून बाला ग्राम येथील अनाथ मुलांना किराणा साहित्य दिले त्याच प्रमाणे पाच गरजवंत विधवा महिला शोधून त्या महिलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी दोन हजार रूपये या पतसंस्थेकडून देण्यात येते. हे सर्व कार्य समाज हिताचे असून यापुढे ही या जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्य जोमात सुरू असून,गेवराई तालुक्यातील गुंतेगाव, कटचिंचोली व लुखामसला या गोदावरी नदी पट्टयावरील व उजव्या कालवा जाणाऱ्या या तीन गावातील शेतकऱ्यांचे कोरोना परिस्थित उत्पन्न वाढीसाठी हातभार लागावा या हेतूने या भागातील 30 शेतकऱ्यांना पशुधन खरेदीसाठी जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्थाने 50 लाख रूपयांचे अर्थ साहाय्य केले आहे. यातून शेतकऱ्यांनी पशुधन खरेदी केले असून, या पैशातून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केल्याने त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या संसालाला आर्थिक मदत ही होत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते वेळी पतसंस्थेच्या अध्यक्षा छाया मस्के, संगिता वादे, संगिता कु-हाडे, सुरेखा काळे, ज्योती अंतरकर, मिरा मस्के, मिरा काळे, उज्वला मस्के, रेणुका गोरे आदींची उपस्थिती होती.
