महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

मेडिकल व इंजिनिअरींग पुर्व परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो रेस्ट करू नका : प्रा. आर. के. चाळक

मेडिकल व इंजिनिअरींग पुर्व परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो रेस्ट करू नका : प्रा. आर. के. चाळक 
शनीट व जेईई ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वेबिनार चे आयोजन.

गेवराई ( प्रतिनिधी), 
गेवराई तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या दोन दशकांपासून दर्जेदार शिक्षण देण्याचे अद्वितीय कार्य करणारे प्रा. आर. के. चाळक यांनी कोरोनाच्या काळात देखील शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवली . इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खुप मोठे नुकसान झाले आहे. तसेच नीट व जेईई ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून आर. के. ज्युनिअर कॉलेज ने ग्रामीण भागातील व गेवराई शहरातील विद्यार्थ्यांसाठी ॲानलाईन वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाइन वेबिनारला अध्यक्ष म्हणून जी. बी. वरबडे , प्रमुख अतिथी आर .के. चाळक , सौ. योगिता चाळक,  प्राचार्य गणेश चाळक , सौ. मनिषा मायकर , ॲानलाईन उपस्थित होते. वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवरील नीट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट तसेच अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जेईई मेन्स आणि जेईई ॲडव्हांस या परीक्षा अनिवार्य आहेत.  इयत्ता दहावी नंतर प्रत्येक विद्यार्थी व पालकाचे मेडिकल आणि इंजिनीअरिंगचे स्वप्न कोरोनाच्या महामारीमुळे धोक्यात आलेले दिसते. याच पार्श्वभूमीवर मेडिकल व इंजिनिअरींग पुर्व परिपरिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आपल्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी रेस्ट करू नये असे प्रतिपादन आर.के. ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक आर. के. चाळक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.  या वेबिनारचे प्रास्ताविक प्राचार्य गणेश चाळक यांनी केले . आज विद्यार्थ्यांना वैद्यकीय व इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रवेश परीक्षांचे स्वरूप कसे असेल?  तयारी नेमकी कधीपासून करावी ? नीट व जेईई अभ्यास कसा करावा ? या विषयी विद्यार्थी व पालक यांच्या मनात अनेक शंका आहेत.  कोरोनाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक करिअर याबाबत प्रचंड भीतीचे वातावरण असताना. शहरातील शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बिंदू असलेल्या आर के ज्युनिअर कॉलेजची टिम ऑनलाइन नीट व जेईई च्या बॅचेस चालू आहेत. यावेळी डॉ. राजेंद्र आंधाळे , तसेच औरंगाबाद वरून पाटील, गोविंद गोंडे , रहीम शेख , क्षितीज जाधव,  दैनिक. सांय. रिपोर्टर चे पत्रकार भागवत जाधव , ज्ञानेश्वर खरसाडे , राजकन्या कुटे , आदी मान्यवरांची ऑनलाईन उपस्थिती होती. या वेबिनारचे सुत्रसंचलन गणेश पवार, तर आभारप्रदर्शन रहीम शेख यांनी केले.

----------------------------------
*चौकट* ( bold ) 
-----------------------------------
*दहावी नंतर इयत्ता आकरावी व बारावी हे दोन शैक्षणिक वर्षे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे आहेत. संपूर्ण देशात थैमान घातलेल्या कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने स्वबळावर शिक्षणाच्या प्रवाहात राहावे. मेडिकल व इंजिनिअरींग पुर्व परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थींनी रेस्ट (आराम) करू नये. कोरोनाच्या सर्व काळज्या घेत ॲानलाईन शिक्षणाच्या प्रवाहात सातत्य ठेवून यश संपादन करावे. आर. के. ज्युनिअर कॉलेज च्या माध्यमातून गेवराई तालुक्यातील विद्यार्थ्यांना नव नविन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी आमची टीम सज्ज आहे. नीट व जेईई ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्व सुविधांचा लाभ घेऊन आपले स्वप्न पूर्ण करावे.