छापील किमतीपेक्षा जादा दराने खताची विक्री रणार्यावर कारवाई करा वंचित बहुजन आघाडी --
सय्यद सुभान भाई
गेवराई प्रतिनिधी : दै महाभारत
खत विक्रेते व दुकानदार यांच्याकडून साठेबाजी करून शेतकऱ्यांची लूट करण्यात येत आहे त्यामुळे खताची गोणी वरील छापील किमती प्रमाणे विक्री करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे गेवराई तालुका अध्यक्ष सय्यद सुभान भाई यांनी केली आहे खरीप हंगामासाठी 2021 पूर्वीचा व नंतरचा पुरवठा झालेला खताचा साठा सर्व खत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे उपलब्ध असलेला खतांचा गोणी वर छापील किमती आहेत परंतु विक्रेत्यांकडून खातात एप्रिल 2021 पूर्वीचा साठा नवीन किमतीने विकला जाऊन किंवा खताचा कुत्रिम खताचा तुटवडा निर्माण करून खते शेतकऱ्यांना छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जाऊ शकते सध्या सर्वत्र करुणा महामारी चे थैमान घातलेले आहे अशा परिस्थितीत शेतकरी मोठ्या आर्थिक आर्थिक संकटात सापडला आहे एप्रिल2021 पूर्वीचा साठा सर्वच खत विक्रेत्यांकडे आहे तरी उपलब्ध असलेला खतांच्या गोणी वरील छापील किमतीत खते विक्री करावी जर कोणी बेभाव खताची विक्री करत असेल तर त्यांच बरोबर बियाणे व कीटकनाशकेवाजवी किमती पेक्षा जास्त शेतकऱ्यांना विकत असतील तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची एक समिती नेमुन त्या माध्यमातून वाढीव दराने खते बियाणे व कीटकनाशके विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष सय्यद सुभान भाई यांनी केली आहे
