काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांना बीड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
शुभम घोडके/गेवराई
गेवराई ( प्रतिनिधी) काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले आहे. खासदार व गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांची राजकीय कारकीर्द उत्तम होती त्यांचा स्वभाव दिलदार होता गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना मदतीला धावणारा नेता म्हणून सर्व परिचित होते तसेच शैक्षणिक कार्यक्षेत्रामध्ये युवकांना मदत ते नेहमी करत असतं शालेय शिक्षणामध्ये युवकांना अडचण निर्माण झाल्यास ते नेहमी युवकांना मदतीचा हात देत असत
तसेच हिंगोली जिल्ह्यांमध्ये त्यांचं वर्चस्व कायम होते त्यांनी अल्पावधीतच काँग्रेस पक्षाला राज्यभर बळकटी देण्याचे काम त्यांनी हाती घेतले होते.बीड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील होते व माणसाचा जपणारा असा नेता होता. त्यांच्या जाण्याने आज काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. आज सकाळी जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष ॲड श्रीनिवास बेदरे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी किरण अजबकर, बळीराम गिराम, महेश जगताप, बाळासाहेब आतकरे, जिजा जगताप आदीजण
उपस्थित होते
