गेवराई रुग्णालयात बदामराव पंडित यांच्या हस्ते शिवसेना मदत कक्षाचा शुभारंभ;
रुग्णांना दररोज देणार अंडी
गेवराई ( प्रतिनिधी ) येथील गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा शुभारंभ करण्यात आला असून, उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी दररोज दोनशे अंडी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने देण्यात येणार आहेत.
शिवसेनेच्या वतीने राज्यभर कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या मदत कक्षाचा गेवराई उपजिल्हा रुग्णालयात, शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ऍड धर्मेंद्र भोपळे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महिला जिल्हा समन्वयक ऍड उज्वलाताई भोपळे, उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, वैद्यकीय मदत कक्ष गेवराई तालुका समन्वयक धर्मराज आहेर, शिवाजी काळे, पापा शिंदे, मुरली गरुड, विष्णुपंत, माऊली धुमाळ आदींसह डॉक्टर यांची उपस्थिती होती. उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना दररोज दोनशे बॉईल अंडी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका समन्वयक धर्मराज आहेर आणि शिवाजी काळे यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आरोग्य विभागाच्या वतीने मिळणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सहकार्य करणार असल्याचे धर्मराज आहेर यांनी यावेळी सांगितले.
