गेवराईच्या 'बजरंग ग्रुप' परिवाराचा प्रामाणिकपणा
गुगल पे वर आलेले 'तेवीस हजार रुपये' परत केले
गेवराई प्रतिनिधी
: येथील व्यापारी समीर बागवान यांनी खरेदी केलेल्या आंब्याची २३ हजाराची रक्कम चुकुन खात्यावर जमा झाली. सदरील प्रकार लक्षात येताच, संस्थापक अध्यक्ष स्व. विश्वनाथराव खंडागळे यांचे कनिष्ट चिरंजीव बाळासाहेब खंडागळे यांनी आपल्या खात्यावर जमा झालेली रक्कम संबंधित व्यापार्यास फोन करुन साभार परत केली. सामाजिक कार्यात अग्रगण्य असलेल्या गेवराईच्या 'बजरंग ग्रुप' परिवारातील या प्रामाणिक कृतीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
गुरूवार, दि.१३ रोजी समीर बागवान यांच्या कडून आंब्याचे व्यापार्यास २३००० रूपये पेमेंट द्यायचे होते. सदरील रक्कम चुकून खंडागळे गुगल पे वर आली. बागवान यांनी फोन करुन, मला ज्यांना रक्कम पाठवायची होती. तीच रक्कम तुमच्या खात्यावर गेल्याचे सांगितले. त्यानंतर, बाळासाहेब खंडागळे यांनी, तुम्ही चिंता करू नका, मी लगेच पैसे परत पाठवतो आणि सगळी रक्कम परत पाठवून दिली. त्यांनी दाखवलेल्या इमानदारीचे कौतुक होत आहे.बाळासाहेब हे माजी गटशिक्षणाधिकारी स्व. व्ही.जी. खंडागळे यांचे चिरंजीव आहेत. गेवराईच्या 'बजरंग ग्रुप' परिवारातील हा प्रामाणिकपणा माणुसकीला धरुन असल्याचे दिसून आले. बाळासाहेब खंडागळे यांच्यासह ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष सुभाष मुळे व सर्व सन्माननीय सदस्यांचे कौतुक होत आहे.
***
