शिक्षक पतसंस्थेने दिले उपजिल्हा रुग्णालयाला 100 ऑक्सीमिटर भेट आयुष्यभर लक्षात राहील ;- तहसीलदार खाडे
येथील शिक्षक पतसंस्थेने येथील उपजिल्हा रुग्णालयाला गुरूवार ता. 13 रोजी नामांकित कंपनीच्या 100 ऑक्सीमिटरची भेट दिली आहे. या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. रुग्णांच्या सोयी सुविधेसाठी समाजाच्या पुढाकाराची गरज असून, दानशूरांनी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यासह
तालुक्यात कोविडचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य विभागासह सामाजिक कार्यकर्ते रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. परंतू , उपजिल्हा रुग्णालयात यंत्र सामग्रीचा तुटवडा जाणवत असल्याने समाजाप्रती असलेल्या बंधीलकीतून येथील गेवराई तालुका शिक्षक पतसंस्थेच्या वतीने गेवराई उपजिल्हा रुग्णालयाला 100 ऑक्सीमिटर भेट देण्यात आले असून
दि. 13 मे रोजी दु.1 वा. तहसीलदार सचिन खाडे यांच्या उपस्थितीत हे ऑक्सीमिटर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.एम.एस.चिंचोळे, डॉ.राजेश शिंदे, डॉ.सराफ यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयाच्या टीमकडे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान या शिक्षक पतसंस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या ऑक्सीमिटर माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर, आरोग्य विभागातील कर्मचारी व रुग्णांच्या वेळोवेळी तपासण्या करण्यासाठी याचा उपयोग होणार असून कोविड काळात आरोग्य विभागासाठी आतापर्यंत सर्वात मोठी मदत गेवराई तालुक्यातील शिक्षक बांधवांकडून झाली असून आशा अडचणीच्या काळात शिक्षक बांधवांनी केलेली मदत ही कायम स्मरणात राहील असा विश्वास तहसिलदार सचिन खाडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी बीड जिल्हा शिक्षक पतसंस्था समन्वय समीतीचे अध्यक्ष तथा गेवराई शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन तात्यासाहेब मेघारे, सचिव सुरेशराव सानप, व्हा. चेअरमन ताराचंद कवरे विष्णु खेत्रे, धनंजय सुलाखे, अण्णासाहेब लोणकर , प्रताप कुडके अर्जुनराव बारगजे , बापुसाहेब तारूकर, श्यामसुंदर कुलकर्णी, बाळासाहेब खंडागळे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व कोरोना रुग्ण सेवा समितीच्या वतीने
महेश दाभाडे, बाळासाहेब सानप, दादासाहेब घोडके, पप्पूशेठ गोलेचा,
गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, पत्रकार सुभाष सुतार, गणेश क्षीरसागर, भागवत जाधव, जुनेद बागवान यांच्यासह आदींची उपस्थिती होती. तर जिल्हाभरातील सर्व शिक्षक पतसंस्थेने अशा प्रकारचे सहकार्य त्या त्या तालुक्यातील शासकीय रुग्णालयाला मदत देण्यासाठी पुढे यावे असे अवाहन गेवराई पतसंस्थेच्या वतीने चेअरमन तात्यासाहेब मेघारे यांनी केले आहे. या उपक्रमाचे तालुक्यातील शिक्षक बांधवांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
