जातेगाव परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांना व कुटुबियांना डाॅ. जिवन राठोड देतात आधार
जातेगाव : दत्ता वाघमारे
गेवराई तालुक्यातील जातेगावसह परिसरात कोरोनाची लागण जास्त प्रमाणात झाली आहे. त्यानंतर जातेगाव येथील डाॅ. जिवनकुमार राठोड यांनी संवेदनशीलता दाखवत कोरोना रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्याशी स्वःताच फोनवरुन संवाद साधत आहेत. जिवनकुमार राठोड हे फोन करत कोरोना रूग्णांना धीर देत आहेत. त्याच बरोबर सर्व वाॅट्सअॅप ग्रुप आणि सोशल मिडियावर त्यांचा सध्या मोठ्या प्रमाणात एक व्हिडिओ हाॅयरल होत आहे. गेवराई तालुक्यासह जातेगाव परिसरातील नागरिकांना कोरोना झाला आहे असे कळताच जे रूग्ण आहेत त्यांना कोरोना झाल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबिय चिंताग्रस्त होत आहेत त्यामुळे अशी बातमी कळताच डाॅ. जिवनकुमार राठोड हे फोन करत त्यांना धीर देत आहेत. त्यांची ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. “डाॅ. राठोड साहेबांचा अचानक फोन रूग्णांच्या नातेवाईकांना जातो आणि नातेवाईक म्हणतात डाॅ. साहेबांनी फोन करून धीर दिला. त्यावेळी काळजी करण्याचं काही कारण नाही, असे सांगितले. त्यासोबतच आपल्या काही रूग्णांचे, नातेवाईक यांचं उदाहरण देत तुमच्या घरचे देखील ठीक होतील असा धीर कुटुंबियांना देत आहेत. त्यामुळे डाॅ. राठोड साहेबांचे सर्वसामान्य रूग्णांवर लक्ष आहे यांची मला जाणीव झाली. मी आणि माझ्या कुटुंबिय डाॅ. साहेबांचे धन्यवाद करतो,” अशी भावना कोरोनाबाधित रुग्णांच्या वडील, नातेवाईक व्यक्त करत आहेत. राज्यासह गेवराई तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे दिवसेंदिवस कोरोना बाधितांची आकडा वाढतच चालला आहे. या कोरोना विरुद्धच्या लढाईत जे कोरोना योद्धे आहेत. ते देखील आता मोठ्याप्रमाणात कोरोनाबाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरजेचं आहे.
