केद्र, राज्य सरकारने घोषित केलेल्या मोफत धान्य प्रत्येक लाभार्थींना वाटप करा-आ.लक्ष्मण पवार
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आ. लक्ष्मण पवारांच्या पुरवठा आधिका-यांला सुचना
गेवराई प्रतिनिधी
कोरोनो महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लाॅकडाऊन सुरू आहे त्या दरम्यान गोरगरीबांना प्रत्येक व्यक्ती ५ कि. लो. मोफत धान्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे त्या अनुषंगाने गेवराई विधानसभा मतदार संघातील प्रत्येक लाभार्थीना मोफतचे धान्य विना तक्रार वाटप करा अशी सुचना आ. लक्ष्मण पवार यांनी गेवराई व माजलगाव तहसीलदार यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे
दिलेल्या पत्रात ते म्हणाले की कोरोनो महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लाॅकडाऊन सुरू आहे त्यामुळे हातावर पोट असलेल्या गोरगरीबांना केद्र व राज्य सरकारने मोफत धान्य देण्याची घोषणा केलेली आहे तरी मे महिन्या पासून प्राधान्ये कुटुंब योजना तसेच अत्योद्य योजनेतील लाभार्थीना प्रती व्यक्ती ५कि.लो. धान्य वाटप करण्यासाठी योग्य नियोजन करून वरील योजनेतील लाभार्थीना मोफतचे धान्य वाटप करावे अशी सूचना आ. लक्ष्मण पवार यांनी यांनी गेवराई, माजलगाव, तहसिल कार्यालयाला पत्राद्वारे केली आहे
