तालखेड,टाकरवन येथे कोविड सेंटर उभारण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ पाठवा:-आ.लक्ष्मण पवार
-----------------------------------------------
तहसील कार्यालय माजलगाव येथे कोविड परिस्थितीचा घेतला आढावा
---------------------------------------------
कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव व कोरोना बाधित रुगणांना मिळणाऱ्या सुविधांच्या निर्माण झालेल्या तुटवड्या बाबत नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी या अनुषंगाने दिनांक 29 एप्रिल 2021 वार गुरुवार रोजी दुपारी ठीक 12 वाजता तहसील कार्यालय माजलगाव येथे गेवराई विधानसभा मतदारसंघात माजलगाव तालुक्यातील येणाऱ्या गावतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आढावा बैठक घेतली व खालील बाबींवर सविस्तर चर्चा केली.
1) तालखेड व टाकरवन या ठिकाणी कोविड सेंटर उभारणे साठी प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणे,
2)माजलगाव येथे ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवणे.
3)रेमडेसीविर इंजेक्शनची उपलब्धता,कोविड सेंटर मध्ये असलेल्या अडचणी,ऑक्सिजन बेडची उपलब्धता या बाबत सविस्तर आढावा घेऊन rtpcr व antigen drive गावागावात घेऊन covid positive रुग्णांवर तात्काळ विलिनीकरण कक्षात ठेवण्यात यावे व रुग्णांवर तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.
या वेळी उपस्थित तहसीलदार श्रीमती पाटील ,तालुका आरोग्य अधिकारी डाॅक्टर घुबडे ,वैद्यकीय अधीक्षक डाॅक्टर साबळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.तसेच नगरसेवक शरदजी यादव, सरपंच शरदजी कचरे हे पण उपस्थित होते
