पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे १०वी व १२वी विद्यार्थ्यांचा "ई" प्रशस्ती पत्र देऊन सत्कार
मुंबई ।।प्रतिनिधी ।।महेश्वर तेटांबे यांसकडून-राज्यात नुकताच १०वी व १२वीतील विद्यार्थ्यांचा निकाल लागला. ब-याच विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातुन ८०टक्के व त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवुन पास झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थ्यींनीकडुन त्यांची गुणपत्रिका,फोटा व सर्व माहिती संकलीत करुन अशा विद्यार्थ्यांचा पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे "ई"प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले.सन्मानपात्र विद्यार्थ्यांची प्रशस्ती पत्र डाॅ.अशोक म्हात्रे यांनी प्रत्येकाला त्यांच्या व्हाटसप नंबरवर ऑनलाईन पाठविली.विद्यार्थ्यांनी हे उज्वल यश संपादन केल्याबद्दल पत्रकार उत्कर्ष समितीचे सचिव डाॅ. वैभव पाटील, कार्याध्यक्ष-अविनाश म्हात्रे, उपाध्यक्ष-राकेश खराडे,खजिनदार-शैलेश ठाकुर,सह सचिव-अमोल सांगळे,सदस्य-ज्ञानेश्वर कोळी ,डी.जी.पाटील, उषा सिन्हा,तसेच महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश अध्यक्षा डाॅ. स्मिता पाटील, कार्याध्यक्षा श्रुती उरणकर, सचिव दीव्या लेकरे यांनी कौतुक व अभिनंदन केले. सर्व प्रशस्ती पत्र तयार करण्यासाठी डाॅ. अशोक म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच पत्रकार उत्कर्ष समिती,महाराष्ट्र व महिला उत्कर्ष समितीच्या सर्व पदाधिका-यांनी या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दील्या.
धन्यवाद
महेश्वर भिकाजी तेटांबे
(सिने दिग्दर्शक, पत्रकार)
9082293867