गौरव गुणवंतांचा
गेवराई ।। प्रतिनिधी
नाभिक समाजातील इयत्ता १०वी व 12वी २०२० च्या परीक्षेत ६०% पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ संलग्न, नाभिक एकता कर्मचारी महासंघाच्या वतीने मा.आण्णासाहेब बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील दहावी व बारावी मध्ये वरील प्रमाणे गुण मिळवुन विद्यार्थी पास झालेत त्यांचा सन्मानपत्राद्वारे गौरव करण्यात येणार आहे. नाभिक समाजातील अनेक विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळालेले आहे. सध्या कोरोनाच्या परिस्थितीत गुणवंत गौरव समारंभ घेणे शक्य नसल्याने अश्या विद्यार्थ्यांचे कौतुक व्हावे त्यांचे समाजाच्या वतीने अभिनंदन करावे या उद्देशाने
गौरव गुणवंतांचा या online उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दहावी व बारावीचे विद्यार्थी 60% व त्या पेक्षा अधिक गुण मिळवुन उतीर्ण झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी विद्यार्थ्यांचा फोटो व मूळ गुणपत्रिकेचा फोटो तसेच पालकाचे संपुर्ण नाव व पत्ता व्हाँट्स अँप मोबाईल क्रमांकासह दिनांक : ३१ऑगस्ट२०२० पर्यंत ८४०८०१८८४४ या व्हाँट्स अँप क्रमांकावर पाठवावेत असे अवाहन राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.संजय वाघ व नाभिक एकता कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर चातुर यांनी केले आहे.