आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन
ऑनलाईन निबंध,चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
बीड (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने ऑनलाईन, निबंध व चित्र कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत चार गट पाडण्यात आले असून उत्कृष्ट पारितोषिके ठेवण्यात आले असून यात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड व नवगण प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड, आ.संदिप भैय्या मित्र मंडळ बीड, नवगण प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने ऑनलाईन निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गट क्रमांक 1 मध्ये वर्ग 1 ली ते 4 थी निबंधाचे विषय माझी आवडती शाळा, माझे आवडते निसर्गरम्य ठिकाण, माझ्या जिल्ह्याची ओळख व चित्रकला हे तुमच्या आवडी नुसार रेखाटून पाठवावे. यामध्ये प्रथम 5000 रू, द्वितीय 3000 रू., तृतीय 2000 रू. पारितोषिके राहणार आहेत. गट क्रमांक 2 मध्ये वर्ग 5 वी ते 7 वी निबंधाचे विषय पाण्याचे महत्व, झाडे निसतील तर?, जिल्ह्यात दुष्काळ पडू नये म्हणून मी काय करू शकतो? व चित्रकला हे तुमच्या आवडी नुसार रेखाटून पाठवावे चित्रकलेसाठी विषयाची अट नाही. यामध्ये प्रथम 5000 रू, द्वितीय 3000 रू., तृतीय 2000 रू. पारितोषिके राहणार आहेत.गट क्रमांक 3 मध्ये वर्ग 8 वी ते 10 वी निबंधाचे विषय शिक्षणात तंत्रज्ञानाचे महत्व, आजच्या युगातील देशासमोरील आव्हाने, शाळा बंद ऑनलाईन शिक्षण सुरु चित्रकला हे तुमच्या आवडी नुसार रेखाटून पाठवावे चित्रकलेसाठी विषयाची अट नाही. यामध्ये प्रथम 7000 रू, द्वितीय 5000 रू., तृतीय 3000 रू. पारितोषिके राहणार आहेत. गट क्रमांक 4 मध्ये खुला गट वयाची अट नाही यामध्ये निबंधाचे विषय युवा आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, माझ्या मतदार संघाचे भविष्य कसे असावे माझ्या नजरेतून, शेतीला वैभव कसे प्राप्त करून देता येईल व चित्रकला हे तुमच्या आवडी नुसार रेखाटून पाठवावे चित्रकलेसाठी विषयाची अट नाही. यामध्ये प्रथम 7000 रू, द्वितीय 5000 रू., तृतीय 3000 रू. पारितोषिके राहणार आहेत.
यासाठी स्पर्धेचे विद्यार्थ्यांनी घरी बसून निबंध लिहून व चित्र काढुन फोटो दि.24 ऑगस्ट 2020 सायं. 5 वा पर्यंत खाली दिलेल्या कोणत्याही एका नंबरवर फोटो पाठवावे. दिलेल्या तारखेच्या नंतर फोटो पाठविल्यास फोटो ग्राह्य धरले जाणार नाहीत. एका उमेदवाराने एकच निबंध लिहून फोटो खाली दिलेल्या वाट्सअॅप नंबर वर पाठवावा. आपले संपूर्ण नाव, गावाचे नाव, मोबाईल नंबरसहित पाठवावे. विद्यार्थी बीड मतदारसंघ व बीड तालुक्यातील रहिवाशी असावेत. गणेश तांदळे मो.9822153553, रंजीत बनसोडे मो. 9028815198, दिपक हजारे मो.9860555225, आमेर अण्णा शेख मो.9730797000 या मोबाईल क्रमांकावर व्हाटसअॅपद्वारे ऑनलाईन निबंध, चित्रकला स्पर्धाचे फोटो पाठवावेत. फोटो पाठवतांना कोविड-19 संदर्भात कोणत्याही आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. विजेत्या विद्यार्थ्यांचे नावे 27 तारखेला प्रसिद्ध करण्यात येतील. स्पर्धेबाबत काही प्रश्न असल्यास वरील दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नवगण प्रतिष्ठान बीड व आ.संदिप भैय्या मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट
बैलजोडी छायाचित्र स्पर्धेला उर्त्स्फुत प्रतिसाद
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने बीड मतदार संघातील शेतकरी बांधवांसाठी खास सुंदर बैल जोडी छायाचित्र स्पर्धा ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. घरी साजरा होणार्या पोळा सणाच्या निमित्ताने सजवलेल्या बैल जोडीचा एक उत्कृष्ट फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. कोविड-19 कोणत्याही आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आल्यानंतर बीड मतदार संघातील शेतकरी बांधवांनी घरी साजर्या होणार्या पोळा सणानिमित्ताने आपल्या सर्जा राजाचे उत्कृष्ट फोटो पाठवले आहेत. या बैलजोडी छायाचित्र स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून यामध्ये प्रथम पारितोषिक 5 हजार, द्वितीय पारितोषिक 3 हजार व तृतीय पारितोषिक 2 हजार असा गौरव शेतकर्याच्या छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांचा केला जाणार आहे.