शिक्षक दिनानिमित्त नाभिक समाजा तर्फे अनोखा शिक्षक सत्कार सोहळा संपन
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील नाभिक समाजातील विविध शिक्षण संस्थेमध्ये तसेच जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदानाचे भरिव कार्य करणाऱ्या शिक्षक बंधू-भगिनींचे गेवराई नाभिक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा आज शिक्षक दिनानिमित्त सन्मान केला.
या सत्कारमूर्तीमध्ये कॅप्टन शंकरराव सूर्यवंशी सर, (सेवानिवृत्त शिक्षक) सौ.प्रतिभा शंकरराव सूर्यवंशी,(कें.प्रा.शाळा जायकवाडी बागपिंपळगाव) सौ अंजली संजय माने (सूर्यवंशी),(भगवान बाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी बागपिंपळगाव) चंद्रकांत लक्ष्मणराव शिंदे सर,(जि.प.प्रा.शा.माळहिवरा) गणेश लक्ष्मणराव आतकरे सर,(मा.वी.दैठण)श्री.प्रीतम बाबुराव पवळे सर,(जय भवानी वि.गढी)सौ.शांता रंगनाथ वखरे,(खंडोबाबा विद्यालय,रेवकी-देवकी) अमोल काळे,(जि.प.प्रा.शा. बोरीपिंपळगाव) सौ.अश्विनी अमोल शेटे,(जि.प.प्रा.शा. बोरीपिंपळगाव) किरण गायकवाड सर, (-जि.प.प्रा.शाळा ठाकरवाडी) सौ.पूजा गजानन जाधव (प्रा.शा.पंडेवाडी ता.राधानगरी जि. कोल्हापूर )या मान्यवर शिक्षक-शिक्षकांचा समावेश होता.
हा सत्कार सोहळा नाभिक एकता कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चातुर यांच्यातर्फे,व नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते,पत्रकार तथा संपादक श्री सुनील पोपळे यांच्या संकल्पनेतून,तसेच कॅप्टन शंकरराव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
या कार्यक्रमास नानासाहेब पंडित (मराठवाडा उपाध्यक्ष)राधाकिसन वैद्य साहेब, सुधाकर गोरे, राजेंद्र गोरे (वाहक गेवराई आगार) राहुल राऊत,श्री.चंद्रकांत पंडित, पप्पू शेठ खंडागळे, राजेभाऊ शिंदे सर (नागझरी कर)श्री रामेश्वर राऊत (माजी तालुका अध्यक्ष) राहुल राऊत बाळासाहेब आतकरे,श्रीचंद्रभान राऊत (एस.टी.चालक) श्री.रंगनाथ वखरे,इत्यादी नाभिक समाज बांधवांच्या हस्ते या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
