नागरीकांना नम्र आवाहन..!
गेवराई विधानसभा मतदार संघात निर्माण झालेल्या अभुतपूर्व पूर परिस्थितीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत. सिंदफणा आणि गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी.
गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. विजयसिंह पंडित हे स्वतः जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलिस प्रशासन, महावितरण आणि आरोग्य विभाग यांच्या संपर्कात आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून सैन्यदल आणि एनडीआरएफ ची टीम पूर्णवेळ मतदार संघात कार्यरत आहे. महायुती सरकार आपल्या सोबत आहे.
आपण सर्वांनी सतर्क आणि जागरुक रहावे, पूराच्या पाण्यापासून घरातील वयोवृध्द व्यक्ति, लहान मुले, जनावरे आणि संसारोपयोगी साहित्य यांची काळजी घ्यावी. कोणालाही कसल्याही प्रकारची मदत लागल्यास खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन आमदार श्री. विजयसिंह पंडित यांनी केले आहे.
शिवछत्र हेल्पलाईन :
१) श्री. कृष्णकुमार केरुळकर - ९७६७८९४१९८
२) श्री. अनिल गोंजारे - ९४२३३३७२३३
३) श्री. पंकज शिंदे - ९४०३५०५०५०
४) श्री. राम दळवे - ७५१७४७८०९०
