क्रांतीसूर्य शिक्षक प्रेरणा पुरस्कारासाठी रामदास वाघमारे यांची निवड
छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी,
शिक्षण क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षक रामदास रखमाजी वाघमारे यांची क्रांतीसूर्य शिक्षक प्रेरणा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता परशुराम सायखेडकर सभागृह, नाशिक येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. छगनजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते रामदास वाघमारे यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
संस्थेचे संचालक प्रा. डॉ. आनंद आहिरे यांनी दिलेल्या निवडपत्राद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे. वाघमारे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले बहुआयामी कार्य, समाजाभिमुख योगदान आणि विद्यार्थ्यांमध्ये जागविलेली प्रबोधनाची प्रेरणा यांची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल विविध स्तरातून रामदास वाघमारे यांना अभिनंदनाचा वर्षाव होत असून, समाजातील शिक्षकवर्गासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरणार आहे.
