महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

हंबर्डे कॉलेजसाठी सरस्वती जाधव आणि प्रा.विष्णू चौधरी यांची सेवा गौरवा पलीकडची आहे ; किशोर नाना हंबर्डे आष्टी प्रतिनिधी

हंबर्डे कॉलेजसाठी सरस्वती जाधव आणि प्रा.विष्णू चौधरी यांची सेवा गौरवा पलीकडची आहे ;  किशोर नाना हंबर्डे      
आष्टी प्रतिनिधी   

हंबर्डे महाविद्यालयात कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव यांची चाळीस वर्षे सेवा झाली.गणित विषयाचे प्रा.विष्णू चौधरी यांची तीस वर्षे सेवा झाली.दोघांनीही निष्ठेने आपली सेवा केली.या महाविद्यालयाचा प्राध्यापक, कर्मचारी वृंद सचोटीने परिश्रम करीत आला आहे.त्यांनी महाविद्यालयाला आपलं मानलं. त्यांचा विद्यार्थी उच्च पदावर सर्व दूर पसरलेला असून तो आजही कर्मचारी,शिक्षकांबद्दल आदर ठेवून आहे.आपणही विद्यार्थी घडवले आहेत, त्यांच्यावर चांगले संस्कार केले आहेत,याचा आनंद प्रत्येकांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. प्रत्येक जण विश्वासाला पात्र ठरला.संस्थाचालक या नात्याने आम्हाला वाटणारा आनंद यापेक्षा वेगळा नाही.कार्यालयीन अधीक्षिका श्रीमती सरस्वती गोविंदराव जाधव आणि प्रा.विष्णू संभाजी चौधरी यांची सेवा म्हणूनच गौरवा पलीकडची आहे.असे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे म्हणाले.दोन्हींच्या सेवा गौरव समारंभात त्यांनी हे प्रशंसनीय उद्गार काढले.दोन्ही कार्यक्रमाला सचिव अतुलकुमार मेहेर,उपाध्यक्ष दिलीप शेठ वर्धमाने,मातोश्री रत्नमाला हंबर्डे, सौ.सुलभा हंबर्डे,सौ.ज्योती मेहेर,सौ.अनिता निंबोरे,ज्येष्ठ पत्रकार,माजी उपप्राचार्य अनंत हंबर्डे,माजी प्राचार्य व्हि.एल.शिंदे,डॉ.प्रताप गायकवाड,सुभान शेठ पठाण,प्रा.महेश चवरे, प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,प्राचार्या सायली हंबर्डे,प्राचार्य बापूराव धोंडे,आदर्श शिक्षक पी. वाय.काळे,राजेंद्र लाड,सुभाष रासकर,भोसले महाराज,पुरी महाराज यांच्यासह अनेक आजी-माजी प्राध्यापक,कर्मचारी यांनी उपस्थिती लावली.श्रीमती लीला शिरोळे, प्रा.अविनाश कंदले,डॉ.अभय शिंदे,प्रियंका माने, पोर्णिमा माने,प्रा.शहाजी माने त्याचबरोबर तानाजी रेडेकर,प्रा.सचिन कल्याणकर, प्रा.डॉ.दत्तात्रेय मुंढे,लक्ष्मण रेडेकर,सोमनाथ वाळके,मधुकर गरगटे,प्रा.बिरुबा शिंदे, प्रा.सुचित्रा जाधव,डॉ.विनय चौधरी यांनी  मनोगते व्यक्त केली.संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते जाधव आणि चौधरी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.प्रा.डॉ.राजाराम सोनटक्के त्यांनी आभार मानले.परिवेक्षक प्रा.अशोक भोगाडे,डॉ. सखाराम वांढरे,प्रा.रवी सातभाई यांनी परिश्रम घेतले.