बीड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती बाबत
बीड, प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांचे कार्यालयासाठी "जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी" हे कंत्राटी पद निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरण्यासाठी जाहिरात व विहीत केलेला अर्जाचा नमूना या कार्यालयाचे वेबसाईट www.beed.nic.in वर दि.21.05.2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
"जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी" या कंत्राटी पदासाठी उमेदवाराने आपला विहीत नमून्यातील अर्ज A-4 साईजच्या पांढऱ्या कागदावर टंकलिखित - हस्तलिखित करुन मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड-431122 या पत्यावर दिनांक 23 मे, 2025 रोजीपासून ते दि. 05 जून, 2025 रोजी सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत विहीत नमून्यात अर्ज पोहोचेल अशा रितीने पोस्टाद्वारे किंवा आवक जावक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे समक्ष सादर करावेत. या कालावधीत कार्यालयीन वेळेत (सुटीचे दिवस वगळून) प्राप्त झालेल्या विहीत नमुन्यातील अर्जाचा विचार करण्यात येईल. अर्जाच्या पाकिटावर ठळक अक्षरात पदाचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
"जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी" या कंत्राटी पदासाठी शैक्षणिक अर्हता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर पदवी (सामाजिक शास्त्रे किंवा आपत्ती व्यवस्थापन) अशी आहे. तसेच प्राप्त अर्जांच्या छाननीनंतर भरती प्रक्रियेसंदर्भात पुढील माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळ www.beed.nic.in वर प्रसिद्ध करण्यात येईल.
"जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी" हे कंत्राटी पद निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरण्यासाठीची संपूर्ण भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडली जाणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, शिवकुमार स्वामी यांनी कळविले आहे.
