महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

कास्ट्राईब महासंघाने गुणवंताच्या सत्कारासोबतच गुणवत्ताधारक मुलांना दत्तक घेण्याचा नवोपक्रम हाती घ्यावा..: मा.आ.अमरसिंह पंडित

कास्ट्राईब महासंघाने गुणवंताच्या सत्कारासोबतच गुणवत्ताधारक मुलांना दत्तक घेण्याचा नवोपक्रम हाती घ्यावा..
: मा.आ.अमरसिंह पंडित

गेवराई 

कास्ट्राईब महासंघ दरवर्षी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या औचित्याने चांगल काम करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा कौतुक सोहळा साजरा करतो, यासोबतच तालुक्यातील विविध भागातील गुणवत्ताधारक मुलांना शोधुन त्यांच्या अडचणीत मदत करण्याचा प्रयत्न केल्यास ते अधिक सार्थकी लागेल अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस मा.आ.अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केली. ते काल कास्ट्राईब महासंघाने आयोजित केलेल्या भिमजन्मोत्सव सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलत होते,तर प्रमुख अतिथींमध्ये गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे, विख्यात सुपरस्पेशालिटी सर्जन डाॅ.अमोल पांडव,कास्ट्राईब चे केंद्रीय महासचिव बापूसाहेब ससाणे, रिपाईं तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर,जेष्ठ शि.वि.अ.महादेव साबळे,माजी पं.स.सदस्य प्रा. शाम कुंड आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल दुपारी एक वाजता गेवराई पंचायत समितीच्या प्रांगणात हा शानदार भिमजन्मोत्सव सोहळा कास्ट्राईब महासंघातर्फे आयोजित करण्यात आला होता.यात विश्वरत्न बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर,तथागत भगवान गौतम बुद्ध व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कास्ट्राईब महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब डोळस यांनी संविधान प्रास्तविकेचे सामुहिक वाचन केले.सभेच्या औचित्याने उपस्थित  अध्यक्ष व प्रमुख अतिथींचा यावेळी महासंघातर्फे स्वागत आणि हृदयसत्कार संपन्न झाल्यानंतर तळेवाडी जि. प.शाळेत इ.तिसरीत शिकणाऱ्या चि.जय जालिंदर चोरमले या बाणेदार आणि चुणचुणीत मुलाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर सुंदर आणि मर्मस्पर्शी भाषण करून उपस्थितांची मने जिंकली, त्या छोट्या मुलाचा मा.आ.अमरसिंह पंडित  यांच्या हस्ते शाल, पुष्पहार देवुन कास्ट्राईब ने कौतुक केले. 
त्यानंतर प्रेरणास्तंभ व कृतज्ञता सन्मान सोहळा हा शानदार समारंभ पार पडला त्यात वैद्यकीय अधिकारी डाॅ. साळुंके, कृषी शास्त्रज्ञ डाॅ.सुरपाम,पर्यवेक्षिका लता डोळस,मंडळ अधिकारी  परमेश्वर काळे, तर शिक्षक सर्वश्री काळूसिंग सोनवणे,श्रीम.विद्या जोशी,सतिश खेडकर, जनार्धन आबुज,
श्रीम.जिजाबाई कव्हळे, शामलाल नवले, जालिंदर साखरे, रघुनाथ मोहळकर, भारत चव्हाण आदी पंधरा अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांना यंदाच्या प्रेरणास्तंभ पुरस्काराने मा.आ.अमरसिंह पंडित यांच्या हस्ते शाल, पुष्पहार,सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व साडी चोळी देवुन सपत्नीक सन्मानित करण्यात आले तर मराठा सेवा संघाचे समन्वयक माजी प्राचार्य राजेंद्र घुंबार्डे, भाजपाचे नेते बाळासाहेब सानप, पत्रकार तथा अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बापू गाडेकर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल चे तालुकाध्यक्ष शिवाजी डोंगरे आदींसह पाच सामाजिक कार्यकर्त्यांना 'कृतज्ञता सन्मान' पुरस्कार देऊन शाल, पुष्पहार सन्मानचिन्ह व साडी चोळी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर तालुक्यातील तीन भूमिपुत्र बहुजन कर्मचाऱ्यांचे पाल्य महापारेषण या उर्जा विभागात वर्ग -1 पदी अर्थात सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वश्री अविनाश मनोहर कांडेकर, कु.योगिता दादाभाऊ लोखंडे,शेंबडे विशाल आबासाहेब यांचादेखील सन्मानचिन्ह,पुष्पहार व शाल देवुन त्यांच्या कुटुंबियांसह सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोहळा आयोजन समितीचे अध्यक्ष तथा गेवराई शिक्षक पतसंस्थेचे संचालक बाळासाहेब दहिफळे सर यांनी मांडताना या सोहळ्याचे हे दहावे वर्ष असुन खऱ्या गुणवंत शिक्षक व कर्मचाऱ्यांची आम्ही दखल घेऊन त्यांचे समाजासमोर कौतुक करण्यामागे समाजहित तर जपतोच शिवाय त्यांच्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी हि भुमिका आम्ही जपत असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रेरणास्तंभ पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. शामलाल नवले यांनी प्रातिनिधिक स्वरूपात  आपली प्रतिक्रिया नोंदवताना  महासंघाकडुन आमचा झालेला माझा गौरव माझ्या आयुष्यभराचं संचित असुन कास्ट्राईब महासंघाच्या संपूर्ण टिम चे भरभरून कौतुक केले, तर अधिकाऱ्यांपैकी कृषी शास्त्रज्ञ डाॅ.सुरपाम यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना कास्ट्राईब महासंघ असे गुणगौरव सोहळे आयोजित करून समाजऋण फेडण्याच काम करताना पाहुन आनंद वाटतो अशी बोलकी प्रतिक्रिया दिली. 
उपस्थित प्रमुख अतिथींपैकी कास्ट्राईब महासंघाचे केंद्रीय महासचिव बापूसाहेब ससाणे यांनी या सोहळा आयोजनाची एकुण भुमिका मांडताना महाराष्ट्राच्या विविध प्रांतात फिरताना अशा स्वरूपाचा स्वयंप्रेरणेने कर्मचारी, शिक्षक एकत्र येऊन स्वखर्चाने कार्यक्रम घेतल्याचे दिसत नाही, म्हणूनच मला हा अनोखा प्रयोग वाटतो, शिवाय आमच्या कार्यक्रमाला कुणी स्पाॅन्सर नाही, कारण अनेकांचे असे समज असतात आणि हल्ली स्पाॅन्सर करून अशा कार्यक्रम करताना दिसतात, पण कास्ट्राईब महासंघ अपवाद आहे अशा शब्दांत खणखणीत पणे आपले विचार मांडले. 
अध्यक्षीय समारोपात आपले विचार मांडतांना मा.आ.अमरसिंह पंडित यांनी आपली वरील भुमिका मांडतानाच 'pay back to society' या तत्वानं अशा कास्ट्राईब महासंघाने आपली उपक्रशिलता सत्कारणी लावावी. हे कौतुक सोहळे तर आवश्यक आहेतच, ते तर अविरतपणे चालतीलच याबद्दल दुमत असण्याच काही कारण नाही, पण त्यासोबतच ग्रामीण प्रतिभावंताच्या पाठीशी कास्ट्राईब ने ठामपणे उभं राहणं हि काळाची गरज बनली आहे. तालुक्याचा स्पर्धा परिक्षेतील यशाचा आलेख चढता रहावा म्हणुन आज कास्ट्राईब महासंघाच्या मंचावरून सुमारे पन्नास लक्ष रू. लागत मुल्य असणाऱ्या  दोन सुसज्ज अभ्यासिका एक तलवाडा येथे तर दुसरी गेवराई शहरात बौध्दविहारानजिकच्या जागेत या वर्षभरात उभा करणार. याच्या तांत्रिक बाबी वगळता इतर सर्व सोपस्कार पार पाडण्याची जबाबदारी सर्वश्री विजय डोंगरे, बापूसाहेब ससाणे आणि किशोर कांडेकर यांची राहिल अशी घोषणा करून सर्वांना सुखद धक्का दिला. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कास्ट्राईब महासंघाचे जिल्हा सहसचिव विश्वभुषण सोनवणे यांनी आपल्या ओघवत्या लयबद्ध आणि लालित्यपूर्ण शब्दभांडाराची पेरण करत सभागृह खेळतं ठेवलं. 
शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार बाळासाहेब दहिफळे सरांनी व्यक्त करून सामुहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली. 
कास्ट्राईब महासंघातर्फे  चविष्ट अशा पुलाव व स्विट डिश चा तालुकाभरातुन उपस्थित राहिलेल्या मान्यवर अतिथी, महिला भगीणी,शिक्षक कर्मचारी यांनी भरभरून स्वाद घेत बाबासाहेबांच्या जन्मोत्सवाचा हा अनोखा सोहळा संपन्न झाला. 
कास्ट्राईब महासंघाच्या या अनोख्या उपक्रमास आपलंही सहकार्य असाव या सद्हेतुने जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष विष्णु आडे, जितेंद्र दहिफळे आणि त्यांच्या सर्व टिम तर्फे पिण्याच्या पाण्याचे जार, बिसलरी वाॅटर यांची सुविधा पुरवली गेली. 
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल आतकरे, सुनिल सुतार,गणेश फड,दयानंद कांडेकर, रोहन कांडेकर, आकाश जाधव, प्रल्हाद शिंदे, बाळासाहेब डोळस, विष्णु आडे, बाळासाहेब दहिफळे, नितीन तिबोले, नितीन कांडेकर,अमोल मनकटवाड,महेश वायभसे, विजय डोंगरे, संजय जवरे, विलास दुधाळ, तात्यासाहेब मेघारे, विष्णु खेत्रे, अर्जुन बारगजे, सुभाष शिंदे आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले.