महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

मराठा कुणबी तरुणांना सुवर्णसंधी सारथी तर्फे सी एस.एम एस दीप पदविका अभ्यासक्रम मोफत

मराठा कुणबी तरुणांना सुवर्णसंधी
---------------------------------------
सारथी तर्फे सी एस.एम एस दीप पदविका अभ्यासक्रम मोफत
----------------------------------------


शुभम घोडके

गेवराई ( प्रतिनिधी)सारथी आणि महाराष्ट्र ज्ञान मंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट प्रोग्राम अंतर्गत 'CSMS-DEEP' या रोजगाराभिमुख पदविका उपक्रमास प्रारंभ झाला आहे. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी या वर्गातील तरुणांना या अभ्यासक्रमाचा लाभ होणार आहे.
         तरुणांची रोजगारक्षमता व स्वयंरोजगार क्षमता वाढविणे, त्यांच्या कौशल्याची कमतरता भरून काढणे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. विशिष्ट डिजिटल कौशल्ये, इंग्रजी भाषा कौशल्ये, संभाषण कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्स यावर प्रभुत्व मिळवून स्थानिक आणि जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेतील संधींसाठी तरुणांना विकसित केले जाणार आहे. या अभ्यासक्रमात प्रत्येकी १२० तासांचे ४ मॉड्यूल असतील. कार्यक्रम कालावधी ४८० तासांचा असून, सहा महिन्यांमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. अर्ज करण्यासाठी https://www. mkcl.org/csmsdeep या संकेत स्थळावर भेट द्यावी या अभ्यासक्रमांसाठी नोंदणीच्या तारखेस उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षांदरम्यान असावे,उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा, आई-वडील, पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र आठ लाखांपेक्षा कमी असावे, महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र, तसेच 'सारथी' ने नमूद केलेली वैध कागदोपत्री पुरावे सादर करावे लागणार आहेत.तरी वरील प्रवर्गातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा मोजक्या जागा शिल्लक आहेत सहा महिने रेगुलर शिवकमल कंप्युटर गेवराई येथे क्लासेस करावे लागतील यांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी संपर्क शिवकमल कंप्युटर महात्मा फुले (तापडिया सिटी) सेंटर बाजार रोड ,गेवराई येथील संचालक प्रशांत ठोसर मो.7219337773 असे आवाहन त्यांनी केले आहे.