आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न झाले. संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर,सर्व संचालक,प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम खास आकर्षण ठरला.प्रा.सायली चौधरी,प्रा.रोहिणी कांबळे, प्रा.मनीषा देवगुडे,प्रा.शोभा नरोटे,प्रा.आनंद देशमुखे,डॉ.अभय शिंदे,डॉ.रवी सातभाई,डॉ.राजाराम सोनटक्के,सांस्कृतिक विभाग प्रमुख कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या परिश्रमातून महाविद्यालयाच्या विद्यार्थी,विद्यार्थिनींनी नृत्य,नाटिका,भारुड असा विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमातून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमात गौतमी आव्हाड,राखी गुंजकर,सीमा साठे,शितल रोकडे,आदिती गायकवाड,कोमल गळगटे,सुप्रिया भवर,दीक्षा निकाळजे,तेजस्विनी चखाले,शेखर निकाळजे,प्रकाश रेडेकर, रोहित शिंदे,ऋषिकेश गाडे,राम मासाळकर, मोनिका पोकळे,साक्षी केरूळकर,दीक्षा खंडागळे,दीक्षा निकाळजे,ऋतुजा देशमुख, समृद्धी वाहटूळे,अमृता पोकळे,काजल पवार,काजल राक्षे,दिपाली तवले,दिपाली केरूळकर,ऋतुजा वाल्हेकर,शिवानी पगारे, अक्षरा मस्के,तक्षशिला गायकवाड,सुनील चौगुले,अमोल चखाले,ऋतिक काकडे, निखिल देशमुख,आदेश शेटे,रोहन काळे, आदींनी सहभाग घेतला.भारुडाच्या सादरीकरणात प्रा.सायली चौधरी यांनी स्वतः सहभाग घेऊन छान रंगत आणली.हंबर्डे महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती.