महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

वै.ह.भ.प. नगदनारायण महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमीत्त आज 25 फेब्रुवारी पासुन भव्य किर्तन सोहळ्याची सुरुवात गजानन महाराज मंदिर गेवराई यि ठिकाणी किर्तन सोहळा

वै.ह.भ.प. नगदनारायण महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमीत्त आज 25 फेब्रुवारी पासुन भव्य किर्तन सोहळ्याची सुरुवात  
------------------
गजानन महाराज मंदिर गेवराई यि ठिकाणी किर्तन सोहळा
------------------
गेवराई(प्रतिनिधी)
         वै.ह.भ.प. नगदनारायण महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमीत्त वै.ह.भ.प. गुरुवर्य महंत महादेव महाराज नारायणगड यांच्या कृपाशिर्वादाने व प्रेरणेने श्री.ह.भ.प.महंत शिवाजी महाराज (मठाधिपती श्री क्षेत्र नारायणगड ) यांच्या शुभहस्ते शनिवारी दि.25 फेब्रुवारी पासुन भव्य  किर्तन सोहळा महोत्सवास  प्रारंभ होत असुन या सोहळ्यात महाराष्ट्रातील ख्यातनाम नामवंत किर्तनकारांची किर्तन सेवेसाठी उपस्थिती लाभणार आहे. या किर्तन महोत्सवाचे हे 12 वे वर्ष असून गजानन महाराज मंदिर गेवराई या ठिकाणी ह.भ.प. अकुर महाराज साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा किर्तन सोहळा होणार आहे.  गेवराईकरांनी व पंचक्रोशीतील भाविकांनी  या किर्तन सोहळ्यास लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.  
        वै.ह.भ.प. नगदनारायण महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमीत्तने गेल्या 11 वर्षापासून भव्य दिव्य अश्या  किर्तन सोहळ्याचे दरवर्षी नियोजनबध्द अयोजन केले जात आहे. यामध्ये शहरातील तसेच तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. तर या वर्षीच्या 12 व्या किर्तन सोहळ्यास शनिवारी  दि.25 फेब्रुवारी रोजी पासून सुरू होणार असून या किर्तन सोहळ्याची सुरुवात संध्याकाळी 9 वाजता ह.भ.प.केशव महाराज घुले केज यांच्या सुश्राव्य किर्तने होणार असून किर्तनसेवा नारायणराव मोटे सर, गणेश मोटे यांची राहणार आहे. रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी सायं ९ वाजता ह.भ.प.महेश महाराज माकनीकर लातुर यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून  किर्तनसेवा उद्धव (नाना) यांची राहणार आहे. सोमवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सायं ९ वाजता ह.भ.प.अनिल महाराज पाटील बार्शी यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून किर्तनसेवा संदिपान दातखीळ, सैदापुर यांची राहणार आहे. मंगळवार दि. २८ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकीकर यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून किर्तनसेवा  ज्ञानेश्वर त्रिंबक वेदरे, शंकर दामोधर वैद्य यांची राहणार आहे. बुधवार दि.०१ मार्च रोजी ह.भ.प. पंडित महाराज क्षीरसागर आळंदी देवाची यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून किर्तनसेवा माधव चाटे यांची राहणार आहे. गुरुवार दि.०२ मार्च  रोजी ह.भ.प.शिवा महाराज बावस्कर बुलढाणा यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून किर्तनसेवा  कचरू गवानराव काकडे, आण्णासाहेब लोणकर यांची राहणार आहे. शुक्रवार दि.०३ मार्च २०२३ रोजी ह.भ.प. विजय महाराज गवळी वाशीम यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून किर्तनसेवा अॅड. परशुराम दादा येवले, साईनाथ जिजा सुरवसे यांची राहणार आहे. शनिवार दि.०४ मार्च  सकाळी १० ते १२ ह.भ.प.प्रेममुर्ती महंत शिवाजी महाराज मठाधिपती श्रीक्षेत्र नारायणगड यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल किर्तनसेवा महेश आण्णा दाभाडे यांची राहणार आहे. या भव्य किर्तन सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.