श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे अखंड हरिनाम सप्ताह व रामकथेचे आयोजन
----------------------------------------
वै.वामन महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहा - महंत दत्ता महाराज गिरी
----------------------------------------
गेवराई(शुभम घोडके)
जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव, (ता.गेवराई) येथे श्री नगद नारायण महाराज व श्री गोरक्षनाथ महाराज यांच्या कृपाशिर्वादाने वै.ब्रम्हनिष्ठ गुरुवर्य महंत वामन महाराज गिरी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त ह.भ.प महंत दत्ता महाराज गिरी यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.२२ जानेवारी पासून ५१ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे तसेच सुप्रसिद्ध रामकथा प्रवक्ते ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांच्या सुमधूर वाणीतून आठ दिवस संगीत तुळशी रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे महंत ह.भ.प.दत्तात्रय महाराज गिरी यांनी केले आहे.
या सप्ताहात महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकारांची किर्तनसेवा होणार आहे. यामध्ये रविवार दि.२२ जानेवारी रोजी गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत (गंगापूर),सोमवार दि.२३ पुरुषोत्तम महाराज बावस्कर(धुळे), मंगळवार दि.२४ विनोदाचार्य शिवाजी महाराज बारस्कर (खानदेश जळगाव), बुधवार दि.२५ तुकाराम महाराज जेहूरकर, गुरुवार दि.२६ वाणीभूषण ज्ञानेश्वर महाराज तांबे, शुक्रवार दि.२७ विदर्भरत्न पदमाकर महाराज देशमुख, शनिवार दि.२८ जनार्धन महाराज आरावेकर, तर रविवार दि.२९ जानेवारी दुपारी १ ते ३ यावेळेत ह.भ.प.महंत दत्तात्रय महाराज गिरी (श्री.क्षेत्र, गोरक्षनाथ संस्थान,कुंभेजळगाव) यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसादाचे वाटप होईल. तरी भाविकांनी अखंड ज्ञानयज्ञ मंडपात बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थानचे महंत ह.भ.प. दत्तात्रय महाराज गिरी व व्यवस्थापक पंचक्रोशी परिसर श्री.क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट -
महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट यांच्या उपस्थितीत रंगणार सात दिवस संगीत भजन
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहात ख्यातनाम कीर्तनकार,भजन सम्राट, गायक, वादक यांची हजेरी असते तर यावर्षी ५१ व्या अखंड हरिनाम सप्ताहात रविवार दि.२२ रोजी भजन सम्राट विशालजी महारगुडे, सोमवारी सदानंद मगर व तुळशीराम आतकरे, मंगळवारी उस्ताद रशिद खान यांचे शिष्य ओम बोंगाणे, बुधवारी बाळासाहेब वाईकर, गुरुवारी प्रख्यात गायक संगीतकार कल्याणजी गायकवाड, शुक्रवारी शंकरराव वैराग्यकर, शनिवारी सुप्रसिद्ध भजन सम्राट पंडित रघुनाथ खंडाळकर आणि युवा गायक शुभम खंडाळकर यांची सेवा होणार आहे.तरी भाविकांनी यांचा लाभ घ्यावा.
चौकट-
रामायणाचार्य समाधान महाराज शर्मां यांच्या रामकथेस उपस्थित रहा
जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर रामकथेत मिळते म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य संगीत तुळशी रामकथा प्रवक्ते ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांच्या सुमधूर अमृततुल्य वाणीतून दि.२२ जानेवारी पासून सकाळी १० ते १ या वेळेत दि.२९ जानेवारी पर्यंत श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव येथे आठ दिवस संगीत तुळशी रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून संगीत तुळशी रामकथेच्या श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.