आष्टी प्रतिनिधी अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि सध्या औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटल मध्ये फेलोशिप करीत असलेले नैपुण्य प्राप्त विद्यार्थी डॉ.सय्यद हुमायुद्दीन अल्लाउद्दीन यांचा कु.नेहल गडाख,डीन डॉ.नीलिमा राजहंस यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील प्रसिद्ध दंत शल्यचिकित्सक डॉ.विशाल महाजन यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.या नैपुण्य सत्कारा बद्दल आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,अविनाश कंदले,कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव,पर्यवेक्षक प्रा.अशोक भोगाडे सर्व प्राध्यापक,कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.