भुरंगट टीमच्या "एकमुखी दी किन्नर " मुव्हीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
गेवराई - (प्रतिनिधी ) -येथील भुरंगट फिल्म इंटरटेनमेंट च्या माध्यमातून या फिल्मच्या निर्मात्या अनुपमा पाटील यांच्या कल्पनेतून यापूर्वी यूट्यूब च्या माध्यमातून अनेक वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स व इतर करमणुकीच्या कार्यक्रमाने महाराष्ट्रभर रसिकांना भुरळ घातलेली आहे .त्यांच्या या सातत्यपूर्ण कामामुळे यंदाच्या एशियन टैलेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मानकरी झाले आहेत . " भुरंगट टीम " प्रस्तुत " एकमुखी दी किन्नर "मूवी या चित्रपटाला पुरस्कार मिळाला असून यातील कलावंतांना देखील प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
दिनांक 2 जानेवारी 2023 ला औरंगाबाद मौलाना आझाद रिसर्च सेंटरला फिल्म फेस्टिवल संपन्न झाला.
एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे बोर्ड मेंबर
तुषार थोरात, लक्ष्मी थोरात,भिकन कांबळे, राजू कांबळे, यांच्यासह निखारे चित्रपटाचे दिग्दर्शक
प्रमुख पाहुणे देवदत्त म्हात्रे या कार्यक्रमास उपस्थित होते . या फिल्म फेस्टिवलचे ज्यूरी म्हणून
ज्यूरी लिंडा यांनी काम पाहिले. या महोत्सवात रोमबन (फिलिपिंन्स ),
मामुद - (यूनाइटेड अरब एमिरेट्स ),
एंड दी वनडे - ( नेदरलैंड ),
गेरालडो जुमावन - (फिलिपिंन्स )
तुषार थोरात - (इंडिया ), बोरजे लैंडबर्ग - (स्वीडन )
यांच्या उपस्थितमध्ये निवड प्रक्रिया झाली .
यामध्ये भुरंगट फिल्मस एंटरटेनमेंट प्रस्तुत -
"एकमुखी दी किन्नर " ला बेस्ट स्टोरी , अनुपमा पाटील ,बेस्ट फिमेल डायरेक्टर ,अनुपमा पाटील,
बेस्ट कैमेरामेन - चंद्रकांत सरोदे,
बेस्ट एक्टर - अनुपमा पाटील, चंद्रकांत सरोदे, मतीन खान, शेख अखिल, बंडुअप्पा सगळे, अनिल खंडागळे , बाळासाहेब माळी , अहमद बेग, संगीता धुताडमल, मनीषा भोसले, मधुकर सरोदे, गीताराम शेजुल, पद्माकर सरोदे, विश्वजीत बेदरे, यश माने या सर्वांना पुरस्कार मिळाले.
प्रथमच गेवराईने आंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. भुरंगट फिल्म व अनुताई पाटील व त्यांच्या सर्व टीमचे ज्येष्ठ विधीज्ञ एडवोकेट सुभाष निकम ,श्रीकृष्ण कनपुरे,प्रकाश दावणगिरे , साहित्यिक प्रकाश भुते, रंगभूमी प्रयोग निरीक्षण मंडळाचे मा.सदस्य प्रा. राजेंद्र बरकसे,संगीत शिक्षक ज्ञानेश्वर मोटे ,लोककला अनुदान समितीचे मा.सदस्य विलास सोनवणे,नुकत्याच आयफा पुरस्कार प्राप्त युवा अभिनेते अशोक कानगुडे, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत रुईकर ,गायक कलावंत विष्णुप्रसाद खेत्रे, लोककलावंत रणजीत सराटे ,युवा नृत्य दिग्दर्शक दीपक गिरी, नाटककार रोहित पुराणिक, डान्स डायरेक्टर विवेक शर्मा, शिवशंकर सोनवणे, गेवराईतील ज्येष्ठ व युवा कलावंतांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.