गेवराई तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी मोफत राशनचा लाभ घ्यावा - तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आवाहन
गेवराई प्रतिनिधी
तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी
अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यानां शासनातर्फे मोफत धान्याचे वितरण जानेवारी २०२३ पासुन करण्यात येणार असून, पात्र कुटुंबाने या मोफत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.
गेवराई तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यानां दर महिन्यात देय नियमित धान्य रास्तभाव दुकानदारांकडुन मोफत वितरीत करण्यात येणार आहे. तसेच, माहे जानेवारी २०२३ पासुन यापुवी देण्यात येणारे पीएमजेकेएवाय ( मोफत धान्य ) शासनाकडुन बंद करण्यात आलेले आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी वगळून इतर शिधापत्रिकाधारक एपीएल शेतकरी लाभार्थी योजना , एनपीएच या शिधापत्रिकाधारक यांना कोणत्याही प्रकारचा धान्याचा पुरवठा करण्यात येणार नाही. तसेच , मिळणरी साखर पुर्वीच्या दरात घ्यावी लागणार आहे. याचीही सर्व शिधापत्रिकाधारकांना नोंद घ्यावी. १ सदरचे धान्य हे १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीसाठी पात्र लाभार्थीना ( अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यानां ) मोफत स्वरुपात मिळणार आहे. त्यामुळे, या सर्व पात्र लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार सचिन खाडे यांनी केले आहे.