महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

हंबर्डे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

हंबर्डे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

आष्टी प्रतिनिधी

आष्टी तालुका
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व शिक्षण प्रसारक मंडळाचे ॲड बी डी हंबर्डे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर "युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास" हे शिबिर टाकळसिंग येथे दि. ०९ते १५ जानेवारी २०२३दरम्यान संपन्न झाले. शिबीराच्या समारोप समारंभात बोलताना कार्यक्रम अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे यांनी या सात दिवसांत विद्यार्थ्यांना एक शिदोरी मिळाली आहे, ती शिदोरी घेऊन आपण वाटचाल करा, ही आयुष्यभर तुम्हाला पुरेल. युवकांचा नक्कीच आता ग्राम शहर विकासाचा ध्यास आहे, ते आपले गाव शहर विकसित करण्यासाठी प्रयत्न करतील. अशी आशा व्यक्त केली. 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टाकळसिंग गावचे सरपंच बलभिम वाघमोडे, उपसरपंच  संपत जगताप, संजय कुमकर, बनकर, उपप्राचार्य डॉ बाबासाहेब इ, उपप्राचार्य प्रा. अविनाश कंदले, पर्यवेक्षक अशोक भोगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक पर बोलतांना व शिबिरांचा संक्षिप्त अहवाल देताना गट समन्वयक तथा कार्यक्रम अधिकारी डॉ रवी सातभाई यांनी सांगितले की सात दिवसांत स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावात ग्रामस्वच्छता, वृक्षांना आळे, आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण तयारी, शिवार फेरीच्या माध्यमातून फळबाग लागवड अभ्यास आदी उपक्रम राबविले. तर समाज प्रबोधन पर व्याख्यानातून बालविवाह, मतदार जनजागृती, व्यसनमुक्ती, जलव्यवस्थापन आदी विविध विषयांवर चर्चा घडवून आणण्यात आली, ग्रामस्थांचे व स्वयंसेवकांचे उद्बोधन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून माननीय राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ आनंद देशमुख,संस्था अध्यक्ष किशोर हंबर्डे, सचिव अतूलशेठ मेहेर, पंचायत समिती सभापती पती बद्रिनाथ जगताप , राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. अरूण देतकर यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले. स्वयंसेवक विद्यार्थी व कार्यक्रम अधिकारी डॉ सुहास गोपणे, प्रा महेंद्र वैरागे, प्रा. शुभांगी खुडे यांनी परीश्रम घेतले.