कृष्णा वादे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दोन दिवशीय क्रिकेट स्पर्धा
---------------------------------------
गेवराई ( प्रतिनिधी )
कृष्णा वादे यांच्या वाढदिवसानिमित्त ए. एम.क्रिकेट क्लब संचलित भव्य दोन दिवशीय क्रिकेट स्पर्धा 21, 22 जानेवारी आयोजित करण्यात आले आहेत.या स्पर्धेत अधिक दृष्टीहीन खेळाडू सहभागी होऊन त्यांच्या क्रीडा कौशल्याचे दर्शन गेवराईकरांना घडणार आहे. या क्रिकेट स्पर्धेचे ठिकाण ताकडगाव रोड आयटीआय मैदान येथे असून यामध्ये दहा टीम सहभागी होणार आहेत. नशीब आजमवणारी चिट्ठी काढून विशेष म्हणजे या स्पर्धेचे समाचोलचन देखील दृष्टीहीन व्यक्तीच करणार आहे. 22 जानेवारी रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.तसेच रोख रक्कम आणि ट्रॉफी या स्वरूपामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्या संघाला तसेच, ‘मॅन ऑफ द मॅच’, ‘मॅन ऑफ द सिरीज’, ‘उत्कृष्ट बॅट्समन’, ‘उत्कृष्ट बॉलर’, ‘उत्कृष्ट फिल्डर’म्हणून सन्मानित केले जाणार आहे. खेळाडूंना वैद्यकीय सेवा देखील पुरवले जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आले आहे.