ॲड.सुभाष राऊत यांच्या उपस्थितीत समतेच्या शिलेदाराचा तलवाडयात वाढदिवस साजरा
तलवाडा ( प्रतिनिधी ) :- गेवराई तालुक्यातील समतेचे शिलेदार म्हणून सर्वपरिचित असलेले महात्मा फुले समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष - पत्रकार बापू गाडेकर यांचा वाढदिवस तलवाडा येथे समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य - ॲड.सुभाष भाऊ राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत समता सदन याठिकाणी मोठया धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष गणेश काळे यांच्या नियोजनातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील समता सदन येथे समतेचे शिलेदार समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष - पत्रकार बापू गाडेकर यांचा वाढदिवस मोठया ऊत्सहात तोफांची सलामी देत साजरा करण्यात आला. तसेच डॉ.आसाराम मराठे यांचे निवास स्थान, निकम दुध डेअरी, उपसरपंच आज्जूशेठ सौदागर यांच्या वतीने त्वरितादेवी मंदिर, माऊली हाॅटेल, अंबिका हाॅटेल आदी ठिकाणी आणि संत-महंत यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तलवाडा पंचक्रोशितील समता सैनिकासह विविध समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. या सत्कार समारंभ प्रसंगी सुभाष राऊत यांच्या सोबत आलेले सुदाम शिंदे, समता परिषचे गेवराई शहराध्यक्ष बाबासाहेब घोडके, सरपंच पती विष्णू तात्या हात्ते, माजी उपसभापती डॉ.आसाराम मराठे, किनगावचे सरपंच रामप्रसाद चाळक, अशोकराव चव्हाण, उपसरपंच आज्जूशेठ सौदागर, राजाभाऊ विटकर, विजय डोंगरे सर, बाळासाहेब गिरी, गणपत नाटकर सर, नजीरभाई कुरेशी, दादाराव रोकडे, तुळशिराम वाघमारे, शेख रफिकभाई, नवनाथ गर्जे, गणेश महाराज कचरे, मदन हातागळे, भरत शिगणे, गोरख काळे, नवनाथ पवार, महादेव हात्ते, शहेंशाह बागवान, ऋषिकेश करडे, अविनाश थोरात, अर्जून कुराडे, सुनिल आठवले, जालिंदर डोंगरे, तुकाराम सुरासे, लक्ष्मण राऊत, सुनिल टेलर, अंकुश महाराज काळे, विकास महाराज मुटके, आर.आर.आबा बहीर, शेख नुरभाई, आबासाहेब ढवारे, नितीन भुंबे तसेच पत्रकार अल्ताफभाई कुरेशी, शेख आतिख, सचिन डोंगरे सर, विष्णू राठोड, अशोक सुरासे, सुमेध करडे, डॉ.सुरेश गांधले यांच्यासह इतर पत्रकार बांधव आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व अधिकारी-पदाधिकारी यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.