भारत सरकारच्या अंगीकृत असलेल्या ईडबी-निडको संलग्नीत संस्थेची बैठक संपन्न
नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
नांदेड दिनांक 14 जाने 2023 शनिवार रोजी ठीक दुपारी 12:30 वाजता भारत सरकारच्या अंगीकृत असलेल्या ईडबी- निडको शी संलग्नित असलेले परम सांस्कृतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली.बैठकीला महाराष्ट्र राज्य रिजनल हेड नागनाथ महादापुरे व जिल्हा क्लस्टर हेड निरज अवस्थी तसेच लक्ष्मी नर्सिह सेवा भावी संस्था, उमरीचे संचालक सुधाकर मुक्कावार, प्रगती सेवाभावी संस्था हिमायतनगरचे संचालक काशिनाथ पोपुलवार, शिवालय प्रतिष्ठान नांदेडचे कार्यवाहक प्रदिप धनजकर, तसेच SNP ग्रुप नांदेड चे उपाध्यक्ष प्रदिपकुमार जैन ह्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.बैठकीत नव्याने क्लस्टर हेड नांदेड पदी नियुक्ती झालेले निरज अवस्थी यांचा सत्कार करण्यात आला.
बैठकीत सर्व संचालकाचे अडी अडचणी, समस्या जाणून घेण्यात आल्या. यानंतर महाराष्ट्र रिजनल हेड नागनाथ महादापुरे यांनी संचालकांच्या सर्व समस्यांचे निराकरण केले,ईडबी विद्यापीठाचे नविन घडामोडी बाबत व Business consultant, Training Centre बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले.
आता आपण सर्व क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यपीठाप्रमाणे ईडबी विद्यापीठ UGC शी संलग्नीत अनेक क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पुरवून परीक्षा घेऊन प्रमाणपत्र बहाल करू शकतो याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले बैठकीचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन क्लस्टर हेड निरज अवस्थी यांनी केले.बैठकीच्या यशस्वीतेसाठी अक्षय वाघमारे यांचे सहकार्य लाभले.