नाभिक एकता महासंघाचा आत्महत्याग्रस्त कुटुंबांस आगळावेगळा मदतीचा हात
नांदेड प्रतीनीधी उज्वला गुरसुडकर
आज नांदेड येथील सालेगाव कै. शिवशांत रचोटकर यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबास आत्मनिर्भर जिवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील नाभिक एकता महासंघाचे मराठवाडा महीला आघाडी अध्यक्षा सौ. उज्वला ताई गुरसुडकर व जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित असलेले मा श्री. नागनाथ महादापुरे साहेब, कर्मचारी महासंघ प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर चातुर साहेब व मराठवाडा अध्यक्ष बालाजी भाऊ गवळी, यांच्या प्रयत्नास मान देऊन नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव (आण्णासाहेब) बिडवे साहेब सह प्रदेश कार्याध्यक्ष किरण भाऊ बिडवे, श्री सुभाष मामा बिडवे प्रदेश सरचिटणीस, ऍड. सुनील कोरडे कायदेविषयक सल्लागार,श्री बालाजी गुरसुडकर, श्री विशाल माने जिल्हाध्यक्ष लातुर, श्री बालाजी कांबळे मजुर फेडरेशन संचालक लातुर श्री उत्तमराव गाजलवाड, अखिल भारतीय जिवा सेना मराठवाडा अध्यक्ष श्री राजीव राचोटकर, यांनी सालेगाव येथे जाऊन सांत्वन पर भेट दिली व उदरनिर्वाहा साठी पिठं गिरणी व डाळ यंत्र देण्यात आले या वेळी शिष्टमंडळासोबत असलेले लातुर जिल्हाध्यक्ष श्री. विशाल भाऊ माने यांनी कै. शिवशांत रचोटकर यांच्या सर्वात लहान मुलीच्या पुढील सर्व शिक्षणाचा खर्च करण्याचे जाहीर केले.या प्रसंगी सालेगाव येथील उपसरपंच व इतर गावकरी मोठ्या संख्येने हजर होते......