नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव बिडवे यांचा नांदेड दौरा व पदाधिकारी नियुक्त्या
नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
नांदेड: दि.12 जानेवारी रोज गुरुवार रोजी नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. भगवानराव (अण्णासाहेब) बिडवे व त्यांच्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी परम समुहाचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ महादापुरे यांच्या परम कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
याचठिकाणी पदाधिकारी नियुक्त्या बाबत बैठक घेण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. नागनाथ महादापुरे हे होते.या बैठकीमध्ये पुढीलप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या.
नाभिक एकता कर्मचारी महा संघाचे जिल्हाध्यक्षपदी श्री.बॅरिस्टर राचोटकर तर सचिवपदी दिगंबर श्रीमंगले, शहर अध्यक्षपदी गंगाधर मलुरकर, शहर उपाध्यक्षपदी सुभाष आण्णा चिनुरकर , आणि महीला शहर अध्यक्षा पदी सौ.सुरेखा राचोटकर व उपाध्यक्षा सौ. सविता श्रीमंगले तर सचिव पदासाठी सौ. किरण ताई चिनुरकर यांची नियुक्ती करण्यात आली.
महात्मा कबीर समता परिषदेकडून महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल नाभिक एकता महासंघाच्या वतीने श्री. नागनाथ महादापुरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी चांगल्या सामाजिक कार्याला आमचे हातभार व सहकार्य लागत असेल तर संघटना व पक्ष न पाहता समाजहितासाठी सहकार्य करणे हे माझे नैतिक कर्तव्य समजतो. अशा कार्याला माझा नाभिक एकता महासंघाला सदैव पाठिंबा राहील असे त्यांनी सांगितले.
व मौजे सालेगाव येथील आत्महत्याग्रस्त परिवारास पिठाची गिरणी देत असल्याबाबत नाभिक एकता महासंघाच्या सर्व टिमचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.....
तसेच या कार्यासाठी सर्वांना एकत्र आणुन चांगले कार्य घडविल्या बद्दल महिला आघाडी मराठवाडा अध्यक्षा उज्वलाताई गुरसुडकर यांचे कौतुक केले.....
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. भगवान अण्णासाहेब बिडवे यांनी सांगितले की, आमच्या संघटनेचे कार्य विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, पुणे येथे खुप मोठ्या प्रमाणात गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. महाराष्ट्रात नाशिक येथे संतपीठ बनविण्याचे काम चालू केले आहे. मराठवाड्यातील नाभिक समाजासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करण्याची इच्छा आहे असेही त्यांनी सांगितले. आत्महत्याग्रस्त परिवारास पिठ गिरणी व डाळ यंत्र देण्याचे आयोजन व नियोजन करणारे सर्वांचेच त्यांनी कौतुक केले.
समाजहितासाठी आपण सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी नाभिक एकता कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. ज्ञानेश्वर चातूर व महिला मराठवाडा अध्यक्षा उज्वलाताई गुरसुडकर यांनी माननीय भगवान अण्णा बिडवे यांच्या आदेशाने पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. किरण भाऊ बिडवे कार्याध्यक्ष नाभिक एकता महासंघ, मा. सुभाष बिडवई सरचिटणीस नाभिक एकता महासंघ, ज्ञानेश्वर चातूर प्रदेशाध्यक्ष नाभिक एकता कर्मचारी महासंघ, अँड. सुनील कोरडे कायदेशीर सल्लागार, बालाजी गवळी मराठवाडा अध्यक्ष, विशाल माने जिल्हाध्यक्ष लातुर, विकास काळे जिल्हाध्यक्ष बीड, बालाजी कांबळे संचालक मजुर फेडरेशन, संजय राऊत चिटणीस कोपरगाव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाला बहुतांश नाभिक समाजबांधव व भगिनी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्वला ताई गुरसुडकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नाभिक एकता कर्मचारी महासंघाचे नांदेड जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री बॅरिस्टर राचोटकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय वाघमारे, सुभाष अण्णा चिनुरकर, सचिन चिनुरकर, बालाजी गुरसुडकर यांचे सहकार्य लाभले......