महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या समीक्षा म्हेत्रे या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून सरिकांना मंत्रमुग्ध केले.

गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या समीक्षा म्हेत्रे या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून सरिकांना मंत्रमुग्ध केले.
----------------------------------------
शुभम घोडके


 गेवराई (प्रतिनिधी ) गेवराई येथे12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून यात समीक्षा म्हेत्रे हिने जिजाऊंच्या कार्यावर भाषण केले. पुढे बोलताना म्हणाली की जय आणि विजय म्हणजे जिजाऊ राजमाता जिजाऊ यांचे बालपण सरदारांची वर्दळ युद्धांची डावपेच युद्ध कला शिकत असतांना झाले त्यांनी त्यावेळी मुलींचा दल तयार केला होता पहाटेच्या वेळी रपेट मारत असताना काही महिला त्यांच्यावर बोलत असतं त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून एक निश्चय केला आणि जिजाऊ मातांच्या आईच्या इच्छेने त्यांनी सहा भाषा शिकण्यास सुरुवात केली यात रामायण, महाभारत, कबीराचे दोहे, नाम देवाच्या गाथा, पुराण, असे त्यांनी वाचन केले. त्यानंतर त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्या सोबत झाला. त्यावेळी जिजाऊमाता यांच्या मनात स्वराज्याची पहाट उगवली होती. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची व्याख्या जिजाऊमातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला तसेच बालपणापासून त्यांना तयार केले.त्यांच्या जयंती निमित्ताने समीक्षा राम म्हेत्रे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. 

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे जिजाऊ माँ साहेब यांची वेशभूषा साकारत समीक्षा राम म्हेत्रे हिने आपल्या भाषणातून उपस्थितांना यांच्या कार्याची आठवण करून दिली. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांना दिलेली शिकवण ही कशा प्रकारे मोलाची ठरली जिजाऊ माँ साहेब यांच्या कार्यपद्धतीबद्दल आपल्या भाषणातून समीक्षाने उपस्थितसमोर आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी गुरुकुल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व सर्व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.