इंधन बचतीसाठी सामुहिक प्रयत्नांची गरज :- पत्रकार सुभाष सुतार
गेवराई प्रतिनिधी
इंधन बचतीचे धोरण एस.टी. महामंडळाच्या आर्थिक हिताचे राहील. त्याशिवाय, राष्ट्रीय संपत्तीचा संदेश ही त्यातून दिला जाईल. म्हणून, महामंडळाच्या चालकांनी स्वतःसह प्रवाशांची काळजी घेऊन इंधन बचतीसाठी प्रयत्न करायला हरकत नाही. असे, प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार यांनी येथे केले.सोमवार ता. 16 रोजी गेवराई आगार कार्यालयाच्या वतीने इंधन बचत पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आगार व्यवस्थापक आडसुळ, आगाराचे अधिकारी तागड,गर्कळ यांची उपस्थिती होती. गेवराई येथील गेवराई बस आगाराच्या वतीने दि. 16 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता इंधन बचत पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पत्रकार सुतार म्हणाले की, आधुनिक काळाशी सुसंगत असे नवे प्रयोग करून बचतीचसाठी बस चालक आणि तांत्रिक विभागाने सजग राहून त्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. आगार व्यवस्थापक आडसुळ म्हणाले की एसटीचा 40% खर्च इंधनावर होतो. त्यामुळे, मोठा भार इंधनासाठी द्यावा लागतो. म्हणून, इंधन बचत आवश्यक आहे. चालकांना नियमितपणे मार्गदर्शन केले जात असल्याचे ही ते म्हणाले. यावेळी तागड यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमात आगारातील उत्कृष्ट कर्मचारी चितळकर,जाधव,दराडे,काकडे, मस्के,गायकवाड, नरवडे,सुरवसे, शिंदे, उघडे, सुळ, पाचे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास बस आगारातील वाहक, चालक व कर्मचारी उपस्थित होते.