मकर संक्रांत व आगामी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गेवराईत "फ्री.झुंबा" वर्कशॉप चे आयोजन
गेवराई प्रतिनिधी :-
गेवराईत नव्याने सुरुवात झालेल्या "आर्ट ऑफ फन अकॅडमी" मध्ये मकर संक्रांत व आगामी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून चार दिवशीय "फ्री झुंबा" वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरापासून गेवराई च्या सांस्कृतिक भूमीत विविध "समर कॅम्प","गरबा-दांडिया" वर्कशॉप, "DJ नाईट्स" अश्या विविध सांस्कृतिक चळवळीतून नाविन्यपूर्ण कलाकृती ची भर घालणारा "आर्ट ऑफ फन" ग्रुप ह्या नववर्षाच्या सुरुवातीला गेवराई करांच्या सेवेचे नगर परिषद स्टेडियम मधील तालुका क्रीडा ऑफिस समोर "आर्ट ऑफ फन अकॅडमी" ची स्थापना करून ह्या हिवाळ्याच्या दिवसात ज्या महिला-मुलींना कामाच्या व्यस्तते पायी स्वतःचे आरोग्य जपण्यास वेळ मिळत नाही.अश्या महिला व मुलींसाठी "आर्ट ऑफ फन अकॅडमी" गेवराईत सौ.रत्नमाला (नानी) मोटे व सौ.शितल ताई दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली 22 जानेवारी ते 25 जानेवारी 2023 या चार दिवशीय "फ्री.झुंबा" वर्कशॉप चे आयोजन करत आहे.तरी जास्तीत जास्त महिला व मुलींनी ह्या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन लवकरात-लवकर खालील दिलेल्या नंबर वर कॉल करून आपली पूर्वनोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन "आर्ट ऑफ फन ग्रुप च्या मार्गदर्शक सौ.रत्नमाला नानी मोटे:-, सौ.शितल ताई दाभाडे, दिपक गिरी :- 8177924756, शिवकुमार सोनवणे :- 9689263220, रोहित पुराणिक :- 9325212199 यांनी केले आहे.