आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालय आणि भाऊ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष कै.बन्सीधरराव धोंडीबापू हंबर्डे यांच्या स्मृतिप्रीतीर्थ राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी साहित्य पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख, सुप्रसिद्ध कवी प्रा.डॉ.दासू वैद्य यांना प्रदान करण्यात आला.रुपये 1001,सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिवअतुल शेठ मेहेर,यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,पर्यवेक्षक प्रा.अशोक भोगाडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.डॉ.दासू वैद्य यांची तूर्तास,तत्पूर्वी ही दोन कवितासंग्रह,क...कवितेचा बालकविता संग्रह,शिवाय आजूबाजूला, मेळ इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत.मराठीतले आघाडीचे कवी,साहित्यिक,एकांकिका, नभोनाट्य,चित्रपट गीत लेखन असे विपुल लेखन त्यांनी केली आहे.कवी दासू वैद्य यांची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते.विसंगती आणि विरोध त्यांच्या कवितेची शक्ती स्थळे आहेत.या अगोदर कवी प्रभाकर साळेगावकर,सोपान हळमकर,श्रीराम गिरी,संजय बोरुडे या साहित्यिक कवींना हा कै.एडवोकेट बन्सीधरराव धोंडीबापू हंबर्डे,राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.भगवान महाविद्यालयात,गंगाई...बाबाजी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.गंगाई... बाबाजी पुरस्कार आणि हंबर्डे साहित्य पुरस्कार या दोन पुरस्कारांनी त्यांना एकाच व्यासपीठावर सन्मानित करण्यात आले.