मॉं संतोषी अर्बनच्या वतीने आज होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रमात महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन
गेवराई : प्रतिनिधी
शहरातील महिलांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या मॉं संतोषी अर्बन च्या वतीने भव्य हळदी कुंकू तिळगुळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित महिलांसाठी अनेक बक्षिसांचा वर्षाव करीत कोण होणार गेवराई ची होम मिनिस्टर या कार्यक्रमाचेही मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आव्हान मॉं संतोषी अर्बनचे चेअरमन संजय भालशंकर यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महिलांना उद्योगासह विविध क्षेत्रात सतत प्रोत्साहन देत व महिलांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या मॉं संतोषी अर्बन च्या वतीने दिनांक 19 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता शहरातील बेदरे लॉन्स येथे भव्य हळदी कुंकू तिळगुळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित महिलांसाठी अनेक बक्षिसांचा वर्षाव करीत सुशिल टकले प्रस्तुत कोण होणार गेवराई ची होम मिनिस्टर या कार्यक्रमाचेही मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संगीत कार्यक्रम, महिलांचे विविध खेळ व पैठणी साडी जिंकण्याची विशेष संधी येणाऱ्या सर्व महिलांना असते. आणि प्रथमच सुशील टकले सर यांचे होम मिनिस्टर द्वारे 21 मोठमोठी ग्रह उपयोगी वस्तु येणाऱ्या व विजयी महिलांना गिफ्ट देण्यात येणार आहे. या साठी प्रथम व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यासाठी स्वतःहून प्रायोजक लाभले आहेत. याचबरोबर उपस्थित सर्व लहान मुलांना चॉकलेट व सर्व उपस्थितांना अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना एक कुपन दिले जाणार आहे व कार्यक्रमाच्या शेवटी ते कुपन काढून विजयी महिलांना पैठणी साडी भेट देण्यात येणार आहे. तरी या सर्व आकर्षक बक्षिसांचा व पैठणी साडीचा सहभागी होऊन महिलांनी आनंद घ्यावा व कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आव्हान मॉं संतोषी अर्बनचे चेअरमन संजय भालशंकर यांनी केले आहे.