सरपंच म्हणून सारंगधर साके यांनाच पसंती
----------------------------------------
खामगावातील नागरिकांचा निर्धार
गेवराई ( प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील खामगाव येथील प्रतिष्ठित नागरिक साके सारंगधर विठ्ठलराव यांनी गेल्या अनेक वर्षापासून मूलभूत सुविधा उपलब्ध करून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, समस्यासह तेथील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र अपार मेहनत केली आहे. तरुण आणि होतकरू युवक असल्यामुळे गावातील मतदारांनी एक निर्धारच केला की आपला मत प्रगतीला आपलं मत विकासाला हाच ध्यास जोपासून प्रत्येकाला घेऊन सोबत करू विकासाला एक मत हेच ब्रीद वाक्य घेऊनच खामगावच्या विकासाचा धागा शिवण्यासाठी खामगाव चे युवा सरपंच म्हणून सारंगधर साके यांनाच पुन्हा एक नंबरची पसंती मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तसेच दिलेल्या वचननाम्याच्या अनुषंगाने लाईट, रस्ते, नाल्या, हनुमान मंदिर सभामंडप बांधकाम, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर, शुद्ध पिण्याच्या पाण्याचे फिल्टर, स्वच्छ व सुंदर गाव करण्यासाठी शौचालय बांधणार, तरुण मुलांसाठी व्यायाम शाळा करणार, रोजगार हमी योजना प्राधान्याने राबवणार, घरकुल योजना राबवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार, अंध, अपंग, वयोवृद्ध यांना संजय गांधी श्रावण बाळ योजना अंतर्गत लाभ मिळवून देणार, शेती रस्ते शिवरस्ते,वस्ती रस्ता तयार करणार, महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी करणार असल्याचं अपक्ष उमेदवार सारंगधर साके यांनी बोलताना सांगितले आहे.