किनगाव विकासाचे माहेरघर करण्यासाठी व गावच्या हितासाठी मतदारांनी संधी द्यावी:-रामप्रसाद चाळक
----------------------------------------
राजकारणात करिअर करायचे असेल किंवा एक उंची गाठायची असेल हाच सर्व धर्म समभाव धागा पकडून त्यांनी दररोज आपल्याला कामात सातत्य ठेवणं गरजेचं असतं त्यामुळे स्वतःलाच संधी निर्माण करावी लागते राजकारणात कुठलीही गोष्ट आपोआप मिळत नाही. मला गावाच्या विकासाची संधी मिळावी म्हणून सातत्याने काम करावे लागत आहे,त्याचप्रमाणे कुणी तरी मायबाप मतदार बंधु, भगिनी एखाद्याला संधी देण्याच्या शोधात असतो. त्यामुळे मी काम जिद्दीने करत राहील असा ठाम निर्धार व्यक्त करूनच लोकसेवेत सक्रिय असणारे उदाहरण म्हणजे रामप्रसाद शिवाजी चाळक होय.
किनगाव येथील रहिवाशी असलेले रामप्रसाद चाळक यांच्या कुटुंबात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. घरातून कधीच कुणी राजकारणात नाही अशा परिस्थितीत एक तरुण म्हणून राजकारणात काम करणं त्यांच्यासाठी चॅलेंजिंग आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु या सगळ्यात त्यांना असं जाणवलं की प्रचंड मेहनती, जिद्दी आणि चिकाटीने लोकांची सेवा करण्याचा ध्यास त्यांनी जोपासला आहे. असो प्रामाणिकपणा असेल तर आव्हानांचा धीरोदत्तपणे सामना करण्याची क्षमता रामप्रसाद चाळक यांच्यामध्ये आहे. राजकारणात कुठलीही पार्श्वभूमी आणि पाठबळ नसलेल्या युवक-युवती यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु तिने स्वतःला सिद्ध केलं पाहिजे स्वकर्तृत्वावर पुढं गेलं पाहिजे.
किनगाव गावात विकासाची शिट्टी वाजवण्यासाठी आपलं अमूल्य मत आपल्या गावच्या विकासासाठी, व समृद्ध गाव करण्यासाठी मी यापुढे निस्वार्थीपणे प्रयत्न करणार आहे मी सर्वप्रथम राजकारणात सक्रिय झालो आहे या मागचा हेतू असाच आहे की 20% राजकारण 80 टक्के समाजकारण हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून किनगाव हे गाव विकासाचं माहेर घर केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मायबाप बंधू-भगिनींनी माझ्यावर विश्वास टाकून आपला अमूल्य मत द्यावे असा विश्वास युवा सरपंच रामप्रसाद चाळक यांनी बोलताना व्यक्त केला.