आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे सोमवार दिनांक 02 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता जालना येथील पोलीस केंद्राचे प्रशिक्षक कमांडो कवी गजानन दराडे त्यांची कविता मैफल रंगणार आहे.असे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी सांगितले.घरात कीर्तनकाराचा वारसा असलेल्या आणि कलावंत गुरुजनांचा ज्ञानप्रसाद मिळालेल्या कवी गजानन दराडे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.कवी इंद्रजीत भालेराव,प्रभाकर साळेगावकर,भारत सातपुते,कैलास दौंड,भारत गाडेकर,अमृता नरसाळे,अनंत कराड,हरीश हातवटे,श्रावण गिरी,अरुण पवार,संगीता होळकर..औटी,नागेश शेलार,इंद्रकुमार झांजे,युवराज वायभासे,सत्यप्रेम लगड,विठ्ठल जाधव,वि.भा.साळुंखे,महादेव लांडगे,राजेंद्र लाड अशा महाराष्ट्रातील नामवंत कवी,कवयित्रींनी नववर्षारंभीच्या कविता मैफिलीत हजेरी लावलेली आहे.संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,सर्व संचालक,डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,अविनाश कंदले,प्रा.अशोक भोगाडे,प्रभारी प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ.सुहास गोपने,प्रा.महेंद्र वैरागे,कर्मचारीवृंद,कार्यालयीन अधिक्षिका सरस्वती जाधव नववर्षारंभीच्या कविता मैफिलीसाठी परिश्रम घेत आहेत.