कटनी( म प्र) मधील कुमारी अमिता चा केला महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने सत्कार
गेवराई प्रतिनिधी
कटनी ( म प्र )येथील सेन (नाभिक) सामाजिक कार्यामध्ये लहानपणीच बाळकडू मिळालेली रणरागिणी,मध्यप्रदेश महिला सेन ( नाभिक ) युवा प्रांत अध्यक्षा, ज्यांचा सन्मान मुख्यमंत्री श्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केला,सेन समाज भूषण कुमारी अमिता श्रीवास यांची विशेष ऐतिहासिक भेट ठरली.
कुमारी अमिता यांनी आपला शिवणकाम करून, जवळपास ९००० हजार गाई जखमी/आजारी आढळल्यास त्यांना घरी आणून त्यावर मोफत उपचार करून जीवनदान दिले आहे आजही त्यांच्या कडे जवळपास १७५ गाई उपचारासाठी त्यांच्या जवळ आहेत,असंख्य अशा पक्षावर,प्राण्यावर त्या आजही उपचार करतात कितीतरी सर्प त्यांनी पकडून जंगलात सोडून दिले आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री श्री शिवराजसिंग चव्हाण यांनी पुरस्कार देऊन सत्कार केला,तसेच त्या सेन (नाभिक) समाज महिला युवा प्रांत अध्यक्ष आहेत त्यांची भेट श्री सेन समाज मंदिर येथे झाली या वेळी त्यांचा सत्कार महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने करण्यात आला.यावेळी श्री गोविंदजी सेन,श्री श्यामसुंदर सेन,श्री दीपक श्रीवास हे हजर होते.कटनी मधील ही रणरागिणी विशेष कोणाकडूनही पैसे न घेता उपचार करत आहे व व्यवसायात जे पैसे मिळतात ते सर्व मुके प्राणी यांच्या उपचारावर करत आहे,खूप मोठे काम उभे केले आहे.
त्यांचे कार्य ऐकून आम्ही भारावून गेलोत, शेवटी त्यांना व त्यांच्या कार्याला सलाम व शुभेच्छा देऊन आम्ही रेल्वेस्थानका कडे रवाना झालोत दिलीपजी अनर्थे, विष्णुजी वखरे,सा.प्रकाश आधार चे संपादक सुनीलजी पोपळे, सुधाकरजी आहेर व श्री बाबासाहेब जगताप. हे उपस्थित होते