वंचितांसाठी काम करण्याची तळमळ वाल्मीक तात्यांच्या धमन्यातून वाहते. डॉ.विलास सोनवणे
आष्टी प्रतिनिधी दै महाभारत
तळागाळातल्या वंचितापर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे.प्रत्येक माणसात खूप काही करण्याची उर्मी असते,त्यांना प्रोत्साहन देणारा कोणी भेटला तर तो उंच झेप घेऊ शकतो.एडवोकेट वाल्मीक तात्या निकाळजे कलावंत आहेत.गुणवंत आहेत.ज्ञानवंत आहेत.वंचितांसाठी काम करण्याची तळमळ वाल्मीक तात्यांच्या धमन्यातून वाहते.असे डॉ.विलास सोनवणे म्हणाले.आष्टी येथील जोगेश्वरी मंगल कार्यालयात शाहू ग्रामीण विकास प्रकल्प आष्टी,जि.बीड यांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार आणि स्फूर्तीपंख या विशेष शिक्षण व सक्ष्मीकरण प्रकल्पाद्वारे आयोजित विद्यार्थी,बाह्यविद्यार्थी स्पर्धक सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी डॉ.राहुल टेकाडे,डॉ. उमेश गांधी,डॉ.बनसोडे,डॉ.शोभा टकले, अनिल जेम्स,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.डॉ.राहुल टेकाडे म्हणाले की,गायन,नृत्य,कसरतीच्या विविध स्पर्धेत लहान मुलांनी नेत्रदीपक प्रदर्शन केले.हेच विद्यार्थी उद्या ऑलिंपिक,जिम्नॅस्टिक सारख्या खेळातून दैदीप्यमान कामगिरी करतील.त्यांना इथले प्रोत्साहन निश्चित कामी येईल.डॉ.उमेश गांधी म्हणाले,कोरोना हा काळ भयावह होता.त्यातून बाहेर पडणे किती कठीण होते.त्याची तीव्रता आजही विसरलो नाहीत.कोरोना योद्धांच्या रूपाने ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.त्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना या रूपाने सलाम आहे.बालक पालक यांच्यासाठी हा कार्यक्रम असल्यामुळे कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी भंडारदरा ही लहान मुलांची कविता गाऊन सादर केली.यावेळी डॉ.रामदास मोराळे,डॉ.संतोष जावळे,डॉ.अमित डोके,परिसेविका शेख बेबी,परिचारिका वैशाली देशमुख,मीरा पोटे, रूपाली पवार,संदिपान धस,उमेश जीपकाटे,तुकाराम लाड,नागेश कारंडे, ओंकार बुरांडे,विशाल माने,अशोक धस,हरी बेदरे,किशोर निकाळजे,कृष्णा गंभीरे,स्वप्निल साळवे,अशोक मोरे,अक्षय निकाळजे, देविदास काळपुंड,सागर निकाळजे,निखिल शिंदे,अविनाश निकाळजे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.एडवोकेट वाल्मीक तात्या निकाळजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.संजय दहातोंडे यांनी सूत्रसंचालन केले.प्रबोधन निकाळजे यांनी सर्वांचे आभार मानले.