केंद्रप्रमुखांची व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे उच्च पात्रता धारक उमेदवार BED ,BA DED , MA , MSc SET ,NET ,PHD धारक यांच्या मधून सरळसेवा च्या माध्यमातून भरा :- युवा शाही संघटनेची, विविध जिल्ह्यातुन शिक्षणमंत्री यांच्या कडे मागणी
नांदेड प्रतीनीधी उज्वला गुरसुडकर
राज्यातील केंद्रप्रमुखांची सरळसेवेने 40% पदे भरताना ज्या उमेदवारांनी MA,MSc ,BED ,BA DED ,SET ,NET ,TET ,CTET,PHD पूर्ण केली आहे,या पात्रता धारक उमेदवारांना संधी मिळावी .
शासन आदेश नुसार केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी भरतीचे प्रमाण 40:30:30 असे आहे आणि पदभरती पद्धती दिली आहे.या नुसारच पदभरती करण्यात यावी या शासन आदेशाचे उल्लंघन होत आहे .म्हणून
1 डिसेम्बर 2022 च्या शासन निर्णय रद्द करावा .
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2022/प्र.क्र.81 / टिएनटि-1 दि. 1 डिसेंबर 2022
हा रद्द करुन पुर्वीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार भरतीप्रक्रिया करण्यात यावी
उच्च शिक्षणाचा राज्यातील सर्वसामान्यांच्या गुणवत्ता पूर्ण विद्यार्थ्यांना फायदा होईल याचाही जाणीवपूर्वक विचार करावा.अन्यथा याविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाईल. सोबतच
यांना प्रतिलिपीद्वारे प्रति देण्यात आल्या मा.नामदार श्री. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,मा.नामदार श्री. गिरीशजी महाजन ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य
,मा. नामदार श्री. दिपकभाई केसरकर शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य
,शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे
,शिक्षण सचिव मंत्रालय शिक्षण उप सचिव मंत्रालय मुंबई यावेळी युवाशाही संघटनेचे तुषार देशमुख, नवनाथ साखरे,राजेश बोरगड, भास्कर तळणे, मीरा आठवले,पोर्णीमा फुलारे,राहुल बोकारे, योगेश पवार,यासह असंख्य बेरोजगार तरुण उपस्थित होते....