महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही गेवराई ते गोंदी रस्ता उखडलेलाच 3 वर्षापासून बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही गेवराई ते गोंदी रस्ता उखडलेलाच 

3 वर्षापासून बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान 

गेवराई ( प्रतिनिधी ) देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्याचे सर्वांना आवाहन केले आहे. मात्र दुसरीकडे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही गेवराई ते गोंदी हा रस्ता उखडलेला असल्याने आणि रहदारीला योग्य नसल्याने गेल्या 3 वर्षापासून गेवराई ते गोंदी बस सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रस्सा दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
                 स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही गेवराई ते गोंदी तालुक्यातील गेवराई- संगम जळगाव, हिंगणगाव- गोंदी या गावांना जाणारा साधा रस्ता व्यवस्थित नाही. दरम्यान काही वर्षांपूर्वी केलेला रस्ता पूर्ण उकडून गेला असून, सध्या तर पावसाने संपूर्ण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात जणू काही तळे साचले आहेत. यामुळे या रस्त्यावरून दळणवळण करणे कठीण झालेले आहे. यातच रस्त्याच्या दुतर्फा ने बाभळी आणि इतर झाडे वाढल्याने हा रस्ता अधिकच  अरुंद झाला होता. याच कारणाने गेल्या तीन वर्षापासून गेवराई ते संगम जळगाव, हिंगणगाव ते गोंदी या रस्त्याने जाणारी बस गेवराई आगार प्रमुखाने बंद केली आहे. गेवराई ते गोंदी सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन अशा बसेस सोडण्यात येत होत्या. परंतु त्या आता बंद असल्याने येथील मुला- मुलींना शाळेत जाण्यासाठी सहा किलोमीटरचा रस्ता चिखल तुडवत आणि खड्ड्यात उड्या मारत जावे लागत आहे. सहा किलोमीटर पायी जाणे- येणे हे या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कठीण बाब आहे. त्यातच मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. खड्डेमय रस्ता आणि एसटी सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. जवळपास १०० विद्यार्थी माध्यमिक शिक्षणासाठी रेवकी येथे येतात. परंतु त्यांच्या यातनांकडे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ नाही अशी स्थिती आहे. दरम्यान दळणवळणाचा आणि विद्यार्थ्यांचा विचार करून तेथील गावकऱ्यांनी स्वखर्चाने रस्त्याच्या दुतर्फा असलेली घनदाट झाडी तोडून काढली आहे. रस्ता रुंद झाला, मात्र तरीही बस सेवा बंदच आहे. सदर गेवराई ते गोंदी या बस पूर्ववत सुरू कराव्यात अशा मागणीचे वेळोवेळी आगार प्रमुखांना येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि शाळांच्या वतीने देण्यात आलेले आहे. परंतु त्यावर कुठलाही ठोस निर्णय एसटी महामंडळाने अथवा गेवराई आगार प्रमुखांनी अद्याप घेतलेला दिसत नाही. त्यामुळे गेवराई ते गोंदी ही बस सेवा तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान आणि त्यांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून तसेच ग्रामस्थांकडून होत आहे. ही बस सेवा सुरु न झाल्यास विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ गेवराईच्या एस टी आगार मध्ये आंदोलन करण्याची शक्यता आहे.